अंतिम वर्ष परीक्षांसाठी हा असेल पर्याय
महाराष्ट्र

अंतिम वर्ष परीक्षांसाठी हा असेल पर्याय

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार होणार

Rajendra Patil Pune

पुणे

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विद्यापीठांना अंतिम वर्षाच्या विद्यार्थांच्या परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. या परीक्षा कशा घ्याव्यात याबाबत विद्यापीठांना नियोजन करावे लागणार आहे.

दरम्यान, परीक्षा घेण्यासाठी किमान दीड महिन्याचा कालावधी अपेक्षित आहे. विशेषत: ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यास प्राधान्य राहील. मात्र अन्य पर्याय विचारात घेऊन परीक्षांचे नियोजन केले जाणार आहे, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली. प्रवेश परीक्षा दिलेल्यांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे अंतिम वर्ष परीक्षांसाठी ऑनलाइनचा पहिला पर्याय असू शकतो. पण अन्य पर्यायही विचारात घेतले जातील, असे डॉ. करमळकर यांनी सांगितले.

डॉ. करमळकर म्हणाले, विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी प्रॉक्‍टर्ड पद्धतीने ऑनलाइन प्रवेश परीक्षा यशस्वीरीत्या घेण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षाही या पद्धतीने होणार आहे. प्रवेश परीक्षा दिलेल्यांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे अंतिम वर्ष परीक्षांसाठी ऑनलाइनचा पहिला पर्याय असू शकतो. पण अन्य पर्यायही विचारात घेतले जातील, असे डॉ. करमळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम वर्ष परीक्षा घेण्याचा निर्णय शुक्रवारी दिला. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या नियोजनाची माहिती डॉ. करमळकर यांनी पत्रकारांशी बोलतान दिली. न्यायालयाने निर्णय दिला असला तरी विद्यापीठाची परीक्षेची यापूर्वीच तयारी केली आहे.

यासंदर्भात बोलताना कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले, परीक्षा घेण्यासंदर्भातील ठराव परीक्षा मंडळाच्या बैठकीत या पूर्वीच झालेला आहे. त्यामुळे आता स्वतंत्र ठराव करण्याची गरज नाही. केवळ परीक्षेचे माध्यम आणि वेळ ठरवावी लागेल. चार ते पाच महिने गेल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ दिला जाईल. त्यानंतर परीक्षा आयोजित केल्या जातील.

तब्बल 2 लाख 14 हजार 134 विद्यार्थ्यांना द्यावी लागणार परीक्षा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची होणार आहे. ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुणे ,अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये एकूण 2 लाख 14 हजार 134 इतकी आहे. या सर्व विद्यार्थ्यांना आता परीक्षा द्यावी लागणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com