Saturday, May 11, 2024
HomeUncategorizedलॉकडाऊनची घोषणा होणार?; मुख्यमंत्री आज रात्री जनतेशी संवाद साधणार

लॉकडाऊनची घोषणा होणार?; मुख्यमंत्री आज रात्री जनतेशी संवाद साधणार

मुंबई | Mumbai

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता साखळी तोडण्यासाठी १२ ते १३ दिवसांचा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

केंद्राची नवीन गाईडलाईन? लॉकडाऊन कसा असणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री जनतेशी संवाद साधणार असून लॉकडाऊनची घोषणा करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे रात्री ८.३० वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधतील. लॉकडाऊनची अंमलबजावणी ही उद्या मध्यरात्रीपासून लागू होणार असल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार, याकडे सर्व राज्याचे लक्ष्य लागून आहे.

यापूर्वी सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले होते की, आज राज्यातील लॉकडाऊबाबत निर्णय घेतला जाईल. ते म्हणाले होते की, राज्यात करोनाचे संक्रमण रोखता यावे यासाठी राज्य सरकारकडून कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. वीकेंड लॉकडाऊनही करण्यात आला आहे. मात्र, तरीही करोना रुग्णांमध्ये सात्त्याने वाढत होत असल्याचे दिसत आहे. रुग्ण वाढीमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. हा ताण लक्षात घेता राज्य सरकार लॉकडाऊन करण्याच्या विचारात आहे. लॉकडाउनचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. आज या निर्णयाची घोषणा केली जाऊ शकते असे संकेत अस्लम शेख यांनी दिले आहेत.

तसेच राज्यात लॉकडाऊन आधी जनतेला पूर्व सूचना देणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जालन्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. अर्थमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यात बैठक झाली. त्यावेळी लॉकडाऊनमधील येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. दरम्यान लॉकडाऊनची जनतेनं मानसिकता ठेवावी आणि लॉकडाऊन लावण्याआधी जनतेला पुरेसा वेळ आणि पूर्वसूचना देण्यात येईल अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.

दरम्यान, करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज महत्त्वाची बैठक पार पडली. राज्यात लागणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीचे वेळापत्रक बदलण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. आता दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे अखेरीस घेण्यात येणार आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या