महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2019 मुलाखतीच्या तारखा जाहीर
अन्य

महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2019 मुलाखतीच्या तारखा जाहीर

आपत्ती व्यवस्थापन सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी दिली माहिती

Rajendra Patil

जळगाव-jalgaon

महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा -2019 च्या मुलाखती 4 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट, 2020 अखेर आयोजित करण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती किशोर राजे निंबाळकर, सचिव, आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र शासन यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

दि.4 ऑगस्ट, 2020 रोजी मुंबई आयोगाचे कार्यालय येथे, दि.6 व 7 ऑगस्ट रोजी नागपूर येथे, दिनांक 10 ते 14 ऑगस्ट रोजी पुणे येथे, दिनांक 17 व 18 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे तर दिनांक 20 व 21 ऑगस्ट, 2020 रोजी नाशिक याठिकाणी परीक्षा होणार आहेत.

सध्या महाराष्ट्रात कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव असल्याने आंतर जिल्हा प्रवासाचे नियमन केले जात आहे. त्यामुळे मुलाखतीचा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्याच्या अनुषंगाने मुलाखतीसाठी येणा-या उमेदवारांना त्यांच्या मुलाखतीच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.

उमेदवारांचे मुलाखत पत्र हे त्यांच्यासाठी आंतर जिल्हा प्रवासाचा पास म्हणून ग्राहय धरण्यात यावा. यासाठी स्वतंत्र ई पास/इतर कोणत्याही परवानगीची आवश्यकता असणार नाही. (संबंधीत उमेदवार यांनी प्रवासाच्या दरम्यान त्यांचे मुलाखतीचे पत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे)

कोव्हिड-19 विषाणुचा प्रसार होवु नये म्हणून केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचना/ निर्देशाचे पालन करण्यात यावे. नागपूर, पुणे, औरंगाबाद व नाशिक येथे आयोजित मुलाखती संदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील ज्या अधिकारी/कर्मचा-यांची नियुक्ती केली जाईल. त्यांचेसाठी मुंबई मुख्यालयातून मुलाखतीच्या ठिकाणापर्यंत व परतीच्या प्रवासासाठी त्यांच्या या संदर्भातील नेमणुकीचे आदेश आंतरजिल्हा प्रवासासाठी पास म्हणून ग्राहय धरण्यात येईल.

(संबंधीत अधिकारी/कर्मचारी यांनी प्रवासाच्या दरम्यान त्यांचे ओळखपत्र व नियुक्तीचे आदेशाची प्रत सोबत बाळगणे आवश्यक आहे) कोणताही उमेदवार मुलाखतीपासून वंचित राहणार नाही व कोणत्याही ठिकाणी त्यांची अडवणुक होणार नाही याबाबतच्या सुचना संबंधितांना निर्गमित करण्यात याव्यात. असेही श्री. निंबाळकर, सचिव, आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र शासन यांनी कळविले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com