जिजाऊ-सावित्रीच्या रूपात अवतरली महालक्ष्मी

जिजाऊ-सावित्रीच्या रूपात अवतरली महालक्ष्मी

मलकापूर - malkapur

एक शौर्य आणि संस्काराची जननी तर दुसरी शिक्षणातून स्त्री उद्धारनी, इथे जिजाऊ-सावित्रीच्या रूपात अवतरली गौराई. राजमाता जिजाऊ (Rajmata Jijau) मॉसाहेब यांच्या प्रेरणेतुन निर्माण झालेले स्वराज्य आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले (Kranti Jyoti Savitribai Phule) यांचा त्याग व परिश्रमांतून सुरू झालेले स्त्री शिक्षणाचे कार्य हे त्यांच्यातील दैवी शक्तीचाच प्रत्यय घडवते. म्हणून या दोन्ही माऊलींना वंदन करण्याच्या हेतुने स्थानिक लक्ष्मीनगर परिसरातील सौ.रेणुका भुजबळ यांनी यंदाच्या गौरी पुजनानिमित्त (Gauri Pujan) जिजाऊ व सावित्रीबाईंच्या रूपातील महालक्ष्मीचे पुजन व नेत्रदीपक सजावट साकारली आहे.

यात छत्रपती शिवरायांना (Chhatrapati Shivarai) संस्कार, स्वाभिमान व स्वराज्य निर्मीतीसाठी अखंड प्रेरणा देणाऱ्या जिजाऊंमधील असामान्य कर्तृत्व जाणवते तर समाजाचा विरोध पत्करून स्त्री शिक्षणाचा वसा घेत पहिली मुलींची शाळा सुरू करून समाजक्रांती घडविणाऱ्या सावित्रीबाईंचा अद्वितीय त्याग दिसुन येतो.

पारंपारिक पद्धतीने साजरा केल्याजत असलेल्या गौराईच्या सणात थोडे वेगळे पण दर्शवणारा देखावा साकरातांना सौ. भुजबळ यांनी नारी शक्तीची विविध रूपे व स्त्रीच्या एक ना अनेक कर्तबगारीचा उल्लेख आपल्या सजावटीतून केलेला दिसुन येतो. त्यातून प्रत्येक महिलेने जिजाऊ सावित्रीचा वारसा चालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तर नक्कीच तीच्या पाठीमागे एक अदृश्य शक्ती उभी राहते. त्यांच्या देखाव्यातून स्त्री ही डॉक्टर, इंजिनियर, पायलट, पोलिस, अंतराळाला गवसनी घालणारी विरांगणा, देश चालविणारी राज्यकर्ती घर चालविणारी, मुला-बाळांना शिक्षित-सुसंस्कारीत करणारी, प्रेम देणारी मात गृहिणी अशा शेकडो क्षेत्रातील हजारो जबाबदाऱ्या अतिशय यशस्वीतेने सांभाळत असल्याचे दर्शविन्यात आले आहे.

सोबतच अनेक सामाजिक समस्यांबाबत जनजागृती करणारे फलक देखील त्यांनी दर्शविले आहे. ही सर्व सजावट करतांना हार-फुले, समई-रोशणाई, फलाहार-फराळ, पंचपकवानांचा नैवेद्य यांमधून जिजाऊ-सावित्री ह्या महालक्ष्मिचीच रूपे असल्याचे सिद्ध होते आहे. असा महालक्ष्मी सजावटीतून दर्शविला जागर स्त्री शक्तीचा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असून या सजावटीचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com