Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedनोकरीचे आमिष दाखवून सहा जणांची लूट- 55 लाखांचा गंडा

नोकरीचे आमिष दाखवून सहा जणांची लूट- 55 लाखांचा गंडा

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

आपण अकोला (akola) जिल्ह्याचा उपजिल्हाधिकारी आहे असे म्हणत वन विभाग (Forest Department), आरोग्य विभागात (health department) नोकरी लावण्याच्या आमिषाने तोतया उपजिल्हाधिकाऱ्यांसह एकाने सहा जणांकडून तब्बल ५४ लाख ९७ हजाराला गंडा घातला. यामध्ये एका टूर्स अँण्ड ट्रॅव्हल्सचालकाचा समावेश आहे. आणखी बऱ्याच जणांची या भामट्यांनी फसवणूक केली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

- Advertisement -

एका चालकाकडून तोतया अधिकाऱ्याने तब्बल ८ लाख ६० हजार रुपये उकळल्याचे समोर आले आहे. फसवणूक करणाऱ्या दोघांविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल वासूदेव पजई (मराठे) (रा. मोयगाव पहूर, ता. जामनेर), अनंता मधूकर कलोरे (रा. मोठी राहोली, ता.जि. अकोला) अशी त्या दोन आरोपींची नावे आहे. विशेष म्हणजे या दोघांनी आजवर करोडो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले असून दोघेही सध्या परभणी जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली.

याप्रकरणी प्रशांत भालेराव (३५, रा.हनुमाननगर, गारखेडा) या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असून तो स्वतः चालक मालक आहे. आरोपी अमोलने प्रशांतचा मोबाईल क्रमांक जस्ट डायलवरुन शोधून त्याच्याशी संपर्क केला आणि १७ आणि २७ ऑक्टोंबर अकोल्याला प्रशांतची इनोव्हा कार (एमएच-१७ बीडी-२९००) भाड्याने घेऊन गेले. त्यावेळेस प्रशांतला आरोपी कलोरे याची ओळख करून दिली होती. वेळोवेळी कार भाड्याने घेतल्याने जाता येता आरोपींनी प्रशांतला विश्‍वासात घेऊन आम्ही वन आणि आरोग्य विभागात कर्मचारी भरती करून देण्यास मदत करतो असे सांगत वनपर्यवेक्षक पदासाठी १२ लाखांची मागणी केली होती. त्यातील रोख ८ लाख आणि भरतीनंतर ४ लाख देण्याचे ठरले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या