बेफिकिरीची परिसीमा; लॉकडाऊन काळात २५० जणांच्या उपस्थितीत लग्न

jalgaon-digital
1 Min Read

पुणे|प्रतिनिधी|Pune

पुण्यातील लॉकडाऊनच्या काळात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एकत्र येण्यासाठी खे कडक नियम करण्यात आले होते. असतानाही बेफिकिरीची परिसीमागाठल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

लग्न समारंभ फक्त ५० जणांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी असताना जून महिन्यात तब्बल २५० जनाच्या उपस्थितीत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला आणि व्हायचे तेच झाले उपस्थित असलेल्यांपैकी २५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दोघांचा कोरोनानमुळे मृत्यू झाला आहे. ३० जूनला हा लग्न सोहळा पार पडला होता. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील नगररोडवरील हयात रिजन्सी या पंचतारांकित हॉटेलला पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. या लग्नात तब्बल २५० वऱ्हाडी उपस्थित होते. लग्न सोहळ्याला उपस्थित २५ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर उपस्थितांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी शिवसेनेचे उपशहर प्रमुख आनंद गोयल यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर कपिल राजेश गर्ग, विशाल उमेशचंद्र तिवारी यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *