Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याकर्जमाफीचे 2334 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात

कर्जमाफीचे 2334 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात

मुंबई- महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील पुढचा टप्पा शासनाकडून वितरित करण्यात आला आहे. याअंतर्गत 2334 कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील तब्बल तीन लाख 53 हजार शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

करोनाचं संकट राज्यात धडकल्यानंतर अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला. या पार्श्वभूमीवर कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकर्‍यांनाही फटका बसला होता. मात्र आता पुन्हा कर्जमाफीचा उरलेला टप्पा पुरवला गेला आहे.

- Advertisement -

शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना राज्य सरकारने जाहीर केली होती. यात 20 हजार 250 कोटीची कर्जमाफी शेतकर्‍यांसाठी करण्यात आली आहे. त्यात 30 लाख 40 हजार शेतकरी पात्र ठरले. पहिल्या तीन टप्प्यांमध्ये 19 लाख शेतकर्‍यांच्या खात्यात निधी जमा करण्यात आला आहे. करोनामुळे आर्थिक संकटात सापडल्याने सलग रक्कम देता आली नव्हती.

उर्वरित 11 लाख शेतकर्‍यांपैकी 30 जून रोजी 1 लाख 34 हजार शेतकर्‍यांसाठी शासनाने रु. 1050 कोटी वितरित केले आहेत. उर्वरित 2334 कोटी रुपयांची रक्कम 3.53 लाख शेतकर्‍यांना वितरित करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या