यंदा औरंगाबादेत साहित्याची मेजवानी! 

यंदा औरंगाबादेत साहित्याची मेजवानी! 

41 वे मराठवाडा साहित्य संमेलन

औरंगाबाद - Aurangabad

देगलूर (जि. नांदेड) येथे मार्च 2020 मध्ये होणारे 41 वे मराठवाडा साहित्य संमेलन (Marathwada Sahitya Sammelan) करोनाच्या प्रभावामुळे स्थगित करण्यात आले होते. 41 वे मराठवाडा साहित्य संमेलन येत्या 25 आणि 26 सप्टेंबर रोजी शहरात होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार यांची निवड करण्यात आली आहे. लोकवर्गणीतून अत्यंत साधेपणाने संमेलन घेणार असल्याचे मराठवाडा साहित्य परिषदेने जाहीर केले.

दीर्घकाळ वाट पाहिल्यानंतर संमेलन रद्द करण्यात आले होते. हे संमेलन येत्या 25 व 26 सप्टेंबर रोजी औरंगाबाद शहरात होणार आहे. वाड्.मयप्रेमी तरुण प्राध्यापकांनी स्थापन केलेल्या 'लोकसंवाद फाउंडेशन'ने संमेलनासाठी निमंत्रण दिले होते. हे निमंत्रण मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत स्वीकारण्यात आले होते. साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांशी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजेश करपे यांनी समक्ष चर्चा केली.

बैठकीला डॉ. राम चव्हाण, डॉ. रामचंद्र काळुंखे, डॉ. गणेश मोहिते, डॉ. हंसराज जाधव, डॉ. रवीकुमार सावंत, प्रा. जिजा शिंदे व राम शिनगारे उपस्थित होते. कमी खर्चात साधेपणाने संमेलन आयोजित करण्यावर चर्चेत शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार दोन दिवस साहित्य संमेलन घेण्याचे निश्चित झाले. करोनाचे दडपण, महाराष्ट्र शासन व स्थानिक प्रशासनाचे बैठक व्यवस्थेचे नियम पाळून संमेलन घेण्याची साहित्य परिषदेची सूचना फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी मान्य केली. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार असतील. 'लोकसंवाद फाउंडेशन'ने संमेलनाची पूर्वतयारी सुरू केली आहे. त्यानुसार बँकेत संमेलनासाठी खाते उघडले असून दोन दिवसात जमा केलेला निधी बँकेत ठेवला आहे.

उस्मानाबाद (Osmanabad) येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या धर्तीवर औरंगाबादचे मराठवाडा साहित्य संमेलन लोकवर्गणीतून घेण्याचे मराठवाडा साहित्य परिषद व लोकसंवाद फाउंडेशनने निश्चित केले आहे. या संमेलनाची 'मसाप'मध्ये अध्यक्ष ठाले पाटील यांनी घोषणा केली. यावेळी उपाध्यक्ष प्रा. किरण सगर, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे व कार्यकारिणी सदस्य डॉ. रामचंद्र काळुंखे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com