महानुभाव पंथाच्या वतीने पंतप्रधानांना 'लीळाचरित्र' भेट!

श्री सुदर्शन महाराज कपाटे यांना मिळाला मान
महानुभाव पंथाच्या वतीने पंतप्रधानांना 'लीळाचरित्र' भेट!

औरंगाबाद- Aurangabad

जगद्गुरू संत तुकाराम (Saint Tukaram) महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यावेळी देहूनगरीत श्रीसुदर्शन महाराज कपाटे (Shri Sudarshan Maharaj Kapate) यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेण्याचा योग जुळून आला. यावेळी जगप्रसिद्ध गुलाबी रंगाच्या हिमरू शाल आणि महानुभाव पंथ, मराठीतील आद्यग्रंथ लीळाचरित्र भेट देऊन पंतप्रधानांचे स्वागत करण्यात आले. या विलोभनीय अशा स्वागताने पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रफुल्लित झाले व त्यांनी महानुभाव पंथाच्या शिष्यमंडळाला पीएमओमध्ये भेटीला येण्याचे निमंत्रणही दिले.

औरंगाबादमधील पैठण रोडवरील महानुभाव आश्रमातील श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टच्या वतीने वर्षभर विविध धार्मिक-सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महानुभाव पंथाच्या वतीने देहू येथे पंतप्रधानांचे स्वागत करण्याची संधी श्री सुदर्शन महाराज कपाटे (Shri Sudarshan Maharaj Kapate) महानुभाव यांना मिळाली.

भारतीय जनता पार्टीच्या आध्यत्मिक आघाडीचे प्रदेशाध्य्क्ष आचार्य तुषार भोसले यांनी पुढाकार घेऊन ही भेट घडवून आणली. विशेष म्हणजे महानुभाव पंथाच्या वतीने देशाच्या पंतप्रधानांना भेटणारे श्री सुदर्शन महाराज (Shri Sudarshan Maharaj) नागराजबाबा कपाटे प्रथम व्यक्ती ठरले. देहूत झालेल्या पहिल्या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचे स्वागत संन्यास वेशाचा रंग असलेल्या गुलाबी शालीने करताना श्री सुदर्शन महाराज कपाटे (Shri Sudarshan Maharaj Kapate) यांनी त्यांच्याशी संवादही साधला.

आपल्या भेटीने मन प्रसन्न झाले. भारतमातेचे आपण असे सुपुत्र आहात जे प्रत्येकवेळी देशाला केंद्रस्थानी ठेवत आपल्या भूमीचा मानसन्मान जगाच्या पटलावर उंचावला आहे. आपल्या हातात देश सुरक्षित असून आम्हाला त्याबद्दल गर्व आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी (Sri Chakradhar Swami) यांचा गुजरात भूमीशी संपर्क असून पंथाच्या पाच अवतारांपैकी तीन अवतारांचा गुजरातशीच संबंध राहिला आहे. महानुभाव पंथाच्या वतीने देशसेवेचे व्रत आणि सेवा अविरतपणे सुरू आहे. पंतप्रधानांच्या या भेटीचे महानुभाव पंथाच्या अनुयायांमध्ये उत्साह संचारला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com