
औरंगाबाद - aurangabad
महिलांच्या (women) आरोग्य (Health) व पोषणा संदर्भात असणाऱ्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे राबवावी असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय (Collector Astik Kumar Pandey) यांनी सांगितले. जिल्ह्यामध्ये प्रसुती पूर्व लिंग निदान चाचणी प्रतिबंध समितीसह विविध योजनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
'गर्भसंस्कार’ व 'चला पौष्टीक जेवण करुया' या उपक्रमाची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येणार असून यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश आरोग्य विभाग व संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी श्री.पाण्डेय यांनी दिले.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास मीना, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दयानंद मोतीपोवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर शेळके, अन्न व औषध प्रशासन विभागाचे दयानंद पाटील,श्री मैत्रे, सुमन प्रकल्पाच्या समन्वयक प्रज्ञा सोनवणे, एनपीसीडीएस चे जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ.जावेद कुरेशी, जिल्हा गुणवत्ता कार्यक्रमचे जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय आरोग्य मिशन , राष्ट्रीय तंबाखु कार्यक्रम नियंत्रण समन्वयक यांची उपस्थिती होती.
चला पौष्टीक जेवण करुया
या उपक्रमातंर्गत जिल्ह्यात स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे. अन्नधान्यातून पौष्टिक जेवण हा उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. 2023 हे वर्ष 'तृणधान्य वर्ष' म्हणून साजरे करण्यात येणार आहे. निरोगी आयुष्यासाठी आहारात तृणधान्याचा समावेश आणि स्थानिक पातळीवरील उत्पादीत होणाऱ्या अन्नधान्याचा वापर आहारात करुन सकस व पौषीक आहार माता, बालक व प्रत्येक नागरिकांना मिळावा. वयोगटानुसार आवश्यक असलेले अन्नघटक याविषयी मार्गदर्शन व जाणिवजागृती करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरीय सामिती स्थापन करुन यात सुमन कार्यक्रम समन्वयक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचे निर्देश यावेळी दिले.