Friday, April 26, 2024
HomeUncategorizedमहाराष्ट्रात आता घरबसल्या मिळणार 'लर्निंग लायसन्स'!

महाराष्ट्रात आता घरबसल्या मिळणार ‘लर्निंग लायसन्स’!

औरंगाबाद – Aurangabad

आरटीओ कार्यालयात होणारी गर्दी कमी करण्यासाठी आता लर्निंग लायसन्सची परिक्षा देणार्‍या उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा देता येणार आहे. या परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांना घरबसल्या लर्निंग लायसन्सची प्रिंट घेता येणार आहे. हा निर्णय परिवहन आयुक्त यांनी घेतला आहे. याप्रमाणे काम करण्याचे निर्देश संबंधित राज्यातील सर्व प्रादेशिक आरटीओ कार्यालय आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना देण्यात आले आहे.

- Advertisement -

परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी 8 जुन रोजी याबाबत आदेश काढले आहे. या आदेशाप्रमाणे शिकाऊ वाहन परवाना घेणार्‍या उमेदवारांना आपले नाव, पत्ता, व स्वाक्षरी यासह आधार क्रमांकाची नोंद संकेत स्थळावर करावी लागेल. यानंतर अर्जदार यांना ऑनलाइन पद्धतीने रस्ता सुरक्षा विषयक व्हिडीओ पाहणी केल्यानंतर घर बसल्या शिकाऊ उमेदवारांना रस्ता सुरक्षा विषयक विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दयावी लागणतील. यात 60 टक्के अचुक उत्तर दिल्यास, चाचणी उत्तीर्ण होऊन उमेदवारांना घरबसल्या लर्निंग लायसन्सची प्रिंट काढता येईल. यामुळे लर्निंग टेस्ट देण्यासाठी आरटीओ कार्यालयात येण्याची नागरिकांना गरज पडणार नाही. तसेच उमेदवारांना मेडीकल प्रमाणपत्रही ऑनलाईन सादर करता येणार आहे. अशी माहितीही आरटीओ विभागाकडून देण्यात आली आहे.

शिकाऊ उमेदवाराला ऑनलाइन परिक्षा देण्याची सुविधा सुरू केली असताना आता मोटारसायकल आणि कार या नवीन वाहनांच्या प्रथम नोंदणीकरिता मोटार वाहन निरीक्षकांमार्फत वाहन तपासणीचीही आवश्यकता राहणार नाही. नवीन वाहन नोंदणीच्या कागदपत्रासोबत वाहनाचा चेसीस नंबर, वाहनांचा फोटो, पॅनकार्ड अन्य आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर विक्रेत्याने शुल्क व कर भरल्यानंतर वाहनांचे नोंदणी क्रमांकही आपोआप जारी होणार आहेत.

ज्या अर्जदारांकडे आधार क्रमांक नाही. अथवा ज्यांना ऑनलाइन परिक्षा दयाची नाही, असे अर्जदार पुर्वीप्रमाणेच परिवहन या संकेत स्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज, डॉक्युमेंट अपलोड, शुल्क भरणा व स्लॉट बुकींग करून कार्यालयामध्ये शिकाऊ अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी येण्याची मुभा दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या