Sunday, April 28, 2024
HomeUncategorizedहवेचा दाब घटल्याने मान्सून अडखळला ; उकाड्यातही प्रचंड वाढ

हवेचा दाब घटल्याने मान्सून अडखळला ; उकाड्यातही प्रचंड वाढ

औरंगाबाद – aurangabad

अंदाजे ५ जूनपर्यंत मराठवाड्यात (Marathwada) दाखल होणाऱ्या मान्सूनच्या गतीमध्ये उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण लाटा कमकुवत झाल्याने मान्सूनच्या गतीमध्ये खोडा निर्माण झाला असून, त्याची गती मंदावली आहे. यामुळे आता अंदाजे १० जूनपर्यंत मराठवाड्यात मान्सूनचे आगमन होण्याची शक्‍यता (Meteorologist) हवामान तज्ञानी वर्तवली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादसह काही जिल्ह्यात उकाड्यातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांच्या सभेला १५ अटीशर्ती

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच यापासून मुक्ती मिळणार असून अंदाजे ५ जूनपर्यंत मराठवाड्यात मान्सूनचे आगमन होईल अशी शक्यता हवामान तज्ञाकडून वर्तविण्यात आली होती. यामुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला होता. मात्र आता त्यास उशीर होणार आहे. यंदा (Andaman) अंदमान बेटावर मान्सून वेळेवर आगमन झाले. परिणामी दक्षिणेस मराठवाड्यात पोषक वातावरण निर्माण झाले होते. यामुळे तापमानात सातत्याने घट सुरू झाली असल्याने उकाड्यापासूनही मुक्ती मिळत होती. अंदाजे ५ ते ७ जूनपर्यंत मराठवाड्यात मान्सूनच्या आगमनाची अपेक्षा हवामान तज्ञानी व्यक्त केली होती. मात्र, मान्सूनची गती मंदावली असून आता अंदाजे १० जूनपर्यंत मान्सून मराठवाड्यात दाखल होईल, अशी शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा त्यामानाने अत्याधिक उन्हाळा अनुभवायला मिळाला. संपूर्ण देशासह मराठवाड्यातील अनेक भागांत उच्चांकी तापमानाची नोंद झाली. उन्हामुळे नागरिकांची तसेच प्राण्यांची काहिली काहिली झाली. औरंगाबादेत ९ मे रोजी सर्वाधिक ४३. २ अंश तापमानाची नोंद झाली होती. एप्रिल व मे महिन्यात सूर्याची दाहकता सर्वाधिक होती. नंतर तापमानात घट झाली. अंदमान बेटावर मान्सूनचे आगमन केल्याने परिणामी दक्षिण राज्यांसह दक्षिण मराठवाड्यात पूर्व मान्सून पावसाने दमदार हजेरी सुरू केल्याने तापमानात कमालीची घट झाल्याचे चित्र आहे. मात्र मराठवाडा अद्याप कोरडाच राहिला असून त्याची प्रतीक्षा वाढली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या