Monday, April 29, 2024
HomeUncategorizedअक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्यांची मोठी आवक

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्यांची मोठी आवक

औरंगाबाद – aurangabad

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या (Akshayya Tritiya) अक्षय्य तृतीयेनिमित्त बाजारात (Mangoes) आंब्यांची आवक वाढली आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून रोज सरासरी ५० क्विंटलहून अधिक आवक होत आहे. जाधववाडी येथील (Market Committee) बाजार समिती आवारात अनेक छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी थेट (Farmers) शेतकऱ्यांकडून माल विक्रीस आणला आहे.

- Advertisement -

करोना लसीकरणावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णयआगीत होरपळलेल्या कुटुंबाला जगण्याचा ‘आधार’!

मंगळवारी (३ मे) अक्षय्य तृतीया आहे. याच मुहूर्तावर फळाचा राजा असलेल्या आंब्यानाही विशेष मागणी असते. अनेक नागरिक या मुहूर्तापासून आंबे खाण्यास सुरुवात करतात. हीच बाब लक्षात घेता गेल्या काही दिवसांपासून व्यापाऱ्यांनी तशी तयारी केली होती.

बाजारात काही प्रमाणात स्थानिकसह गुजरातमधील केसरची आवक झाली आहे. यासह लालबाग आंब्याची आवक कर्नाटकमधून, दशेरीची आवक गुजरातसह दिल्ली आदी भागातून तर बदामची आवक कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण आदी भागातून होत आहे. तसेच बाजारात कर्नाटकचा हापूसही दाखल झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

दरम्यान, बाजारात ६७ क्विंटल आंब्याची आवक झाली. किमान भाव ८ हजार रुपये तर, कमाल भाव २२ हजार रुपये प्रती क्विंटल असल्याचे बाजार समितीने सांगितले. गेल्या पाच दिवसांत या ठोक बाजारात ४०० क्विंटलहून अधिक आंब्याची आवक झाली आहे. आंब्याची आवक काही प्रमाणात वाढल्याने गेल्या १० ते १५ दिवसाच्या तुलनेत दरात काहीशी घसरण झाल्याचे जुना जकात नाका येथील फळ विक्रेते सय्यद अकबर यांनी सांगितले. यात आठ दिवसांपूर्वी १४० ते १६० रुपये प्रती किलो दराने मिळणाऱ्या लालबागचा दर सध्या १०० ते १२० रुपयांच्या घरात आहे. बदामचे दरही किलोमागे २० रुपयांनी कमी झाले. तर २०० ते २५० रुपयांनी मिळणारा गुजरातचा केसर आंबा आता १६० रुपये किलो या दराने उपलब्ध आहे. यासह दसरीसह कर्नाटक हापूसचे दरही कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या