Friday, April 26, 2024
Homeक्रीडाकोलकाता तिसऱ्या विजयासाठी सज्ज

कोलकाता तिसऱ्या विजयासाठी सज्ज

अहमदाबाद | आयपीएल २०२१ मध्ये आज दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर खेळवण्यात येणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर सायंकाळी ७:३० वाजता करण्यात येणार आहे. दिल्ली कोलकातावर मात करून स्पर्धेतील आपला पाचवा विजय संपादन करण्यासाठी सज्ज आहे. तर दिल्लीला नमवून तिसऱ्या विजयासाठी कोलकाता सज्ज आहे…

दिल्ली आणि कोलकता यांच्यात आतापर्यंत झालेल्या २६ सामन्यांमध्ये १४ सामन्यांमध्ये कोलकाताने बाजी मारली आहे. तर ११ सामन्यात दिल्लीने कोलकात्यावर सरशी साधली आहे. १ सामना टाय झाला आहे. दिल्ली संघाच्या खात्यात सहा सामन्यांमध्ये ४ विजय आणि २ पराभवांसह ८ गुण आहेत. तर कोलकता सहा सामन्यांमध्ये २ विजय आणि ४ पराभवांसह ४ गुणांनीं पाचव्या स्थानावर आहे.

- Advertisement -

दोन्ही संघांची तुलना केल्यास दोन्ही संघांमध्ये अनेक म्याचविनर खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. कोलकता संघाने आपला अखेरचा सामना जिंकला असल्यामुळे त्यांची गाडी पुन्हा एकदा रुळावर आली आहे. शिवाय पंजाबकिंग्जविरुद्ध गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे कोलकाताने पंजाबला २० षटकात १२३ धावत रोखले होते. ही चांगली बाब आहे शिवाय कर्णधार ऑईन मॉर्गनला आपली लय गवसली आहे.

मात्र पंजाबविरुद्ध सामन्यामध्ये कोलकाता संघाचे सलामीवीर नितीश राणा , शुभमन गील संघाला चांगली सुरुवात करून देण्यात अपयशी ठरले होते. त्यांना आपली कामगिरी उंचावण्याची संधी आहे. सुनील नारायण फलंदाजीत अपयशी ठरला आहे. त्याच्याकडुन चांगली कामगिरी संघाला अपेक्षित आहे. दिल्लीविरुद्ध सामन्यामध्ये कोलकता संघाच्या फलंदाजीत बदल केला जाण्याची शक्यता आहे.

सलामीला शुभमन गील सोबत सुनील नारायण येण्याची शक्यता आहे. गोलंदाजीत शिवम मावी , प्रसिद्ध कृष्णा , आणि पॅट कमिन्स , वरुण चक्रवर्ती , सुनील नारायण फॉर्मात आहेत. पंजाबकिंग्जविरुद्ध मिळवलेल्या शानदार विजयात या सर्व गोलंदाजांची कामगिरी निर्णायक ठरली होती. दिल्लीविरुद्ध अशीच कामगिरी अपेक्षित आहे.

दिल्ली संघाला आरसीबीविरुद्ध झालेल्या चुरशीच्या लढतीत अवघ्या १ धावेने हार पत्कारावी लागली होती. ही हार मागे सारून नव्या रणनीतीने मैदानात उतरण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स सज्ज आहे. दिल्ली संघासाठी जमेची बाजू म्हणजे सलामीवीर शिखर धवन , आणि पृथ्वी शॉ चांगली सुरुवात करून देत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. बंगळुरविरुद्ध सामन्यात कर्णधार रिषभ पंत , आणि शिमरॉन हेटमायर यांनी दिल्लीला विजयासमीप नेण्याचा प्रयत्न केला पण पराभव टाळू शकले नाहीत. मात्र त्यांना लय गवसली असल्याचे त्यांनी दाखवून दिले .

मात्र अजिंक्य रहाणेजागी संधी मिळालेला स्टीव्ह स्मीथ फलंदाजीत अपयशी ठरला आहे. अष्टपैलू मार्कस स्ट्रोइनीस आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीत अद्याप आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकलेला नाही. त्यांना आपली कामगिरी सुधारण्याचे संधी आहे.

गोलंदाजीत अमित मिश्रा , आवेश खान , ईशांत शर्मा फॉर्मात अहेत . मात्र संघाचा प्रमुख गोलंदाज कांगिसो रबाडा विकेट्स मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे. त्याला आपला फॉर्म परत मिळवण्याची संधी आहे. दोन्ही संघांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास दिल्लीच पारडं थोडस जड दिसत आहे.

सलील परांजपे नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या