एसबीआयच्या महाव्यवस्थापकांनी जाणून  घेतल्या व्यावसायिकांच्या समस्या

महाव्यवस्थापक राजेश कुमार यांचा दौरा 
एसबीआयच्या महाव्यवस्थापकांनी जाणून 
घेतल्या व्यावसायिकांच्या समस्या

औरंगाबाद - Aurangabad

उद्योगधंद्याच्या माध्यमातून तुम्ही देशाची अर्थव्यवस्था बळकट करत आहात. तुमच्या व्यवसायाला बळकटी देण्यासाठी भारतीय स्टेट बँक (State Bank of India) ही सदैव तुमच्या पाठीशी राहेल. सरकारची धोरणे आणि नियमानुसार तुमच्या व्यवसाय वृद्धीसाठी सदैव सहकार्य करेल, असे आश्वासन भारतीय स्टेट बँकेचे महाव्यवस्थापक राजेश कुमार (General Manager Rajesh Kumar) यांनी शहरातील उद्योजक, बांधकाम आणि वाहन व्यावसायिकांना दिले.

राजेश कुमार २१ जुलैपासून चार दिवसांच्या औरंगाबाद भेटीवर होते. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रातील व्यावसायिकांशी संवाद साधला. २२ जुलै रोजी त्यांनी हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये बांधकाम व्यावसायिकांची संघटना क्रेडाईचे पदाधिकारी आणि सदस्यांशी चर्चा केली. त्यांच्या व्यवसायासाठी लागणारे कर्ज तसेच गृहकर्जाबाबत त्यांना आणि ग्राहकांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. त्या कशा सोडवता येतील, याबाबत मार्गदर्शन केले. यानंतर लघु व मध्यम उद्योग तसेच बँकेच्या एचएनआय ग्राहकांना विविध सुविधांची माहिती दिली.

२३ जुलै रोजी त्यांनी उद्योजकांची संघटना सीएमआयए, लघुउद्योग भारती आणि व्हायब्रेंट औरंगाबादच्या सदस्यांसोबत एसबीआयची सेवा अधिक सोयीस्कर कशी करण्याबाबत चर्चा केली. त्यांना बँकेच्या नवीन उत्पादनांबाबत माहिती दिली. यापाठोपाठ राजेश कुमार यांनी शहरातील वाहन विक्रेत्यांची चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. वाहन कर्जाला अधिक चालना मिळावी यासाठी बँकेच्या योजना त्यांना समजावून सांगितल्या.

घाटीला ऑक्सीजन कॉन्सनट्रेटरची भेट

सामाजिक दायित्वाअंतर्गत एसबीआय फाऊंडेशनतर्फे घाटी रूग्णालयाला ५ ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरची भेट देण्यात आली. याप्रसंगी घाटीच्या वैद्यकिय अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, बँकेचे उपमहाव्यवस्थापक रवि कुमार वर्मा तसेच डॉक्टर व बँकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com