'दमरे'कडून एक लाख टनाहून अधिक मालाची वाहतूक

किसान रेल्वे ठरली फायदेशीर  
'दमरे'कडून एक लाख टनाहून अधिक मालाची वाहतूक

औरंगाबाद - Aurangabad

कृषी क्षेत्राला चालना मिळावी, यासाठी दमरेने 5 जानेवारी रोजी नांदेड विभागातून प्रथमच नगरसोल येथून पहिली (Kisan Railway) किसान रेल्वे सुरू केली. तेव्हापासून फक्त 9 महिन्यांतच (Nanded Railway Division) नांदेड रेल्वे विभागाने नगरसोल येथून 337 किसान रेल्वेद्वारे देशभर विविध ठिकाणी एक लाख टनाहून अधिक कृषी मालाची वाहतूक केली आहे. यामुळे या क्षेत्रातील कृषी क्षेत्राला चालना मिळाली आहे.

नगरसोल येथून या 337 किसान रेल्वेव्दारे कांदा, टरबूज, टमाटे आणि द्राक्षे असा एक लाख टन माल देशभरातील विविध शहरांत जसे, न्यू गुवाहाटी, मालदा टाऊन, न्यू जलपैगुरी, अगरतला, गौर, मालदा, दानकुनी, चितपूर, संक्रेल इत्यादी ठिकाणी पोहोचविण्यात आला आहे. कृषी क्षेत्राच्या मार्केटिंगकरिता अडचणी मुक्त, सुरक्षित व जलद वाहतूक सेवा उपलब्ध करून देताना कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढविण्यासाठी किसान रेल चालवण्याची संकल्पना भारत सरकारने सुरू केली आहे.

किसान रेल्वेचे वैशिठ्य म्हणजे या गाड्या निश्चित वेळापत्रकानुसार धावतात, साधारण 50 किलोमीटर प्रतिघंटा या वेगाने धावतात, यामुळे शेती माल वेळेवर पोहोचले. शेतकर्‍यांना चांगली बाजार पेठ उपलब्ध होते.

शेतकर्‍यांना आणखी प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ऑपरेशन ग्रीन्स -टॉप टू टोटलच्या अंतर्गत किसान रेलगाड्यांद्वारे अधिसूचित फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर 50 टक्के वाहतूक दर सवलत देण्याची घोषणा केली. या संधीचा लाभ घेत या परिसरातील शेतकरी आणि शेतीमाल व्यापार्‍यांनी एकट्या नगरसोल रेल्वे स्थानकावरूनच एक लाख टन कृषी मालाची वाहतूक केली.

नांदेड रेल्वे विभागातून मालवाहतूक वाढावी म्हणून नांदेडचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी बिजनेस डेवलोपमेन्ट युनिट (बी.डी.यु.) ची टीम गठीत केली आहे. या टीम मध्ये चार वरिष्ठ अधिकार्‍यांची नियुक्ती केली गेलीय. हे अधिकारी नांदेड रेल्वे विभागातील विविध ठिकाणी भेटी देवून मालवाहतूक वाढवण्याकरिता सतत प्रयत्न करत आहेत. दमरेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी शेतकरी आणि शेतीमाल व्यापारी यांना कुठलीही अडचण न येऊ देता किसान रेल्वे ची सेवा इतर रेल्वे स्थानकावर वाढविण्यावर भर द्यावा. असे आवाहन नांदेड रेल्वे विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना आवाहन केले आहे.

Related Stories

No stories found.