Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedकिंग्ज इलेव्हन पंजाबचे नाव आता 'पंजाब किंग्ज'

किंग्ज इलेव्हन पंजाबचे नाव आता ‘पंजाब किंग्ज’

चेन्नई | ‘आयपीएल’चा चौदावा हंगाम येत्या ११ एप्रिल ते ६ जून या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेतील किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला आतापर्यंत एकदाही स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आलेले नाही…

पण आगामी येणाऱ्या १४ सिजनपूर्वी पंजाब संघाने आपल्या नावात आणि लोगोमध्ये बदल केला आहे. आता किंग्ज इलेव्हन पंजाब पंजाब किंग्ज या नावाने स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवणार आहे.

- Advertisement -

पंजाबचा संघ बऱ्याच काळापासून आपलं नाव बदलण्याचा विचार करत होता. पंजाबचा संघ मोहित बर्मन , नेस वाडिया आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा यांच्या मालकीचा आहे. पंजाब संघाला मागील १३ हंगामांमध्ये केवळ २ वेळा बाद फेरी आणि एकदा अंतिम फेरीत आपला प्रवेश निश्चित करता आला आहे. तसेच संघाने मागील १३ वर्षांमध्ये आपल्या संघाचे नेतृत्व बदलेलं आहे .

चेन्नईत होणाऱ्या लिलावाच्या काही दिवस आधी संघाने आपल्या नावात बदल केलेला आहे. आगामी १४ व्या हंगामापूर्वी पंजाबने ग्लेन मॅक्सवेलसारख्या खेळाडूला संघातून वगळले आहे.

पंजाब संघाकडे लिलावासाठी सर्वात जास्त ५० कोटींपेक्षा अधिक रक्कम शिल्लक आहे. पण या हंगामासाठी संघाचे नेतृत्व लोकेश राहुलकडे कायम ठेवण्यात आले आहे. तसेच अनिल कुंबळे संघाचे मुख्य प्रशिक्षक असणार आहेत.

पंजाब संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आज गुरुवारी होणाऱ्या लिलावामध्ये आपला संघ अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करतील.

पंजाब संघाकडे मागील १३ सिजनमध्ये अनेक अनुभवी खेळाडू तसेच म्याचविनर खेळाडू असूनही संघाला आपली कामगिरी उंचावता आलेली नाही. आता चेन्नईत होणाऱ्या लिलावसाठी पंजाबचा संघ काय रणनीती आखतो ? आणि आगामी हंगामात कशी कामगिरी करतो ते पाहणे महत्वाचे असणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या