धक्कादायक... जेवताना रडणाऱ्या मुलीला ठार मारून पुरले!

अल्पवयीन आरोपी जेरबंद
धक्कादायक... जेवताना रडणाऱ्या मुलीला ठार मारून पुरले!

औरंगाबाद - Aurangabad

गंगापूर तालुक्यातील अंतापूरमध्ये सावत्र पित्याने लेकीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे आरोपी पिता हा अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे. त्याने एका 20 वर्षीय महिलेशी लग्न केले होते. जेवताना सतत रडते म्हणून सावत्र पित्याने मुलीचा खून केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

या घटनेमध्ये पिता अवघ्या १४ वर्षांचा आहे. मुलगी जेवताना सतत रडते म्हणून रागात पित्याने तिचा खून केला. आरोपी वडिल इथपर्यंतच थांबला नाही तर त्याने पुढे चिमुकलीला चक्क जमिनीत पुरले. गंगापूर तालुक्यातील अंतापूर गावातली ही घटना घडली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शोध सुरू केला. यावेळी पोलिसांनी चिमुकलीचा मृतदेह जमिनीतून बाहेर काढला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. पोलीस सध्या या घटनेचा कसून तपास करत असून आरोपी पित्याला ताब्यात घेतलं असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com