सोलापूर-धुळे महामार्गाची खैरे यांनी केली पाहणी

औट्रम बोगद्याचे काम सुरू 
सोलापूर-धुळे महामार्गाची खैरे यांनी केली पाहणी

औरंगाबाद (Aurangabad) -

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग ( Solapur-Dhule National Highway) ५२ (२११) अंतर्गत आलेल्या तक्रारी नुसार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पाहणी केली. रस्त्यावर पडलेले खड्डे व पुलाजवळ तडे आणि चिरा तातडीने दुरूस्ती करावे, अशी सूचना संबंधित अधिकारी यांना दिल्या. तसेच फतीयाबाद, टापरगाव, गल्ले बोरगाव-देवगाव फाटा, कसाबखेड-शिवूर रोड आदी रस्त्यांची पाहणी करून दुरूस्ती सूचना यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ( Shiv Sena leader Chandrakant Khaire) यांनी दिली.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ (२११) सोलापूर-धुळे रस्त्यांचे काम जवळपास पुर्ण झाले आहे. मात्र स्थानिक नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडवण्यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी लक्ष्य घातले. या पाहणीस शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत, प्रकल्प संचालक अविनाश काळे, महेश पाटील, आशिष देवतकर, बिपीन वर्मा, संघर्ष समिती अध्यक्ष तथा शिवसेना तालुका संघटक डॉ. अण्णासाहेब शिंदे, अंधानेर सरपंच अशोक दाबके, राजू राठोड, डॉ. एस. जे. जाधव, डॉ. सदाशिव पाटील, विभागप्रमुख सोपान गोलाईत, विजय बारगळ आदींसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काम प्रगतीपथावर

कन्नड-चाळीसगाव औट्रम घाट बोगद्याचे (Autram Tunnel) काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी महामार्ग संघर्ष समिती व गावकऱ्यांचे एक लाख सह्यांचे निवेदन शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी, नीती आयोगाचे अमिताभ कांत यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग चेयरमन यांना दिल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे या बोगदा मंजुरीचे काम प्रगती पथावर आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com