Monday, April 29, 2024
HomeUncategorizedकोरोनाबाधितांसाठी शाळा, महाविद्यालये तयार ठेवा-आरोग्य सचिवांच्या सूचना

कोरोनाबाधितांसाठी शाळा, महाविद्यालये तयार ठेवा-आरोग्य सचिवांच्या सूचना

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

सद्य:स्थितीत राज्यामध्ये कोविड रुग्णांच्या (Covid patients) संख्येत वाढ होत आहे. यासाठीच्या उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या (Department of Health) सचिवांनी आढावा बैठक घेऊन संचालक, सहसंचालक, उपसंचालक तसेच राज्य टास्क फोर्स यांना जिल्हा स्तरावर रुग्णालयाची तयारी औषधसाठा व इतर साधनसामग्रीच्या तयारीचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. कोरोनाबाधितांचे अलगीकरण करण्यासाठी शाळा, महाविद्यालये, कार्यालये तयार ठेवा, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या.

- Advertisement -

रुग्णालय स्तरावर आणि कार्यक्षेत्रात भेटीदरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांनी सौम्य ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, घशामध्ये खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्यांची तपासणी करणे, कोविडसाठी आरटीपीसीआर पॉझिटिव्ह असणाऱ्यांचे नमुने नियमित पाठवावेत, कोविडच्या तयारीबाबत मॉकड्रिल १० आणि ११ एप्रिल रोजी संस्थांमध्ये घेण्यात यावे, रुग्णालयात औषधी व साहित्य उपलब्ध राहतील याची खातरजमा करावी, प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष सुरू करण्याच्या सूचना सचिवांनी दिल्या. 

गर्दीच्या व बंदिस्त ठिकाणी सहव्याधी असणाऱ्या व्यक्‍ती आणि वृद्ध यांनी जाणे टाळावे मास्कचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, शिंकताना, खोकताना नाका-तोंडावर झाकण्यासाठी रूमालाचा वापर करावा, वारंवार हात धुवावेत, सार्वजनिक ठिकाणी खोकणे टाळावे, सर्दी, खोकला व तापाची लक्षणे असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा, सर्वांनी कोविड बूस्टर डोस लसीकरण करावे, कोविड उपचार व निदानाची सोय शासकीय रुग्णालयात उपलब्ध आहे. लक्षणे सौम्य असली तरी कोविडचा प्रसार इतरांना होऊ नये म्हणून कार्यालये, शाळा, महाविद्यालये, गर्दीच्या  ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी न जाता पूर्ण बरे होईपर्यंत विलगीकरणात रहावे. जिल्ह्यातील आरोग्य विभागाने सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक तथा अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन सुदर्शन तुपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या