कमलनयन बजाज रुग्णालयाने सुरू केले रोबोटिक-असिस्टेड सर्जरी युनिट

वाजवी दरात उच्चस्तरीय शस्त्रक्रिया
कमलनयन बजाज रुग्णालयाने सुरू केले रोबोटिक-असिस्टेड सर्जरी युनिट

औरंगाबाद - aurangabad

(Kamalanayan Bajaj Hospital) कमलनयन बजाज रुग्णालयाच्या वतीने, (Marathwada) मराठवाडा व परिसरातील रुग्णांना (Medical Technology) वैद्यकीय तंत्रज्ञानातील सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखले जाणारे जागतिक दर्जाचे रोबोटिक सहाय्यक शस्त्रक्रिया (Robotic Assisted Surgery) सुविधा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. रुग्णालयाने अमेरिका स्थित, नाविन्यपूर्ण अशी आरएएस तंत्रज्ञानांपैकी एक, दा विंची एक्स प्रणाली स्थापित केले आहे. मराठवाड्यातील आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील रुग्णांना वाजवी दरात प्रगत आरोग्यसेवा प्रदान करण्यासाठी ही अत्याधुनिक प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

कमलनयन बजाज रुग्णालयाने सुरू केले रोबोटिक-असिस्टेड सर्जरी युनिट
Video पिंपळगाव हरेश्वर येथील ‘हरीहरेश्वर मंदिर’ एक प्राचीन तपोभुमी

या अत्याधुनिक युनिटविषयीची माहिती देताना विश्वस्त आणि व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सी. पी. त्रिपाठी म्हणाले, “विविध प्रकारच्या आजारांचे निदान करण्यासाठी कमलनयन बजाज रुग्णालयाने सर्वोत्तम सुविधा देण्यावर भर दिला आहे. त्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाची गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही आधुनिक रोबोटिक- सहाय्यक शस्त्रक्रिया प्रणालींपैकी एक स्थापित केली आहे, दा विंची एक्स (चौथे जनरेशन सिस्टीम) जी अनेक जटिल शस्त्रक्रियांच्या बाबतीत अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे मराठवाड्यातील रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये जाऊन उपचार घेण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे रुग्णाचे होणारे आर्थिक नुकसानही न होता सर्वोत्तम शस्त्रक्रिया उपचार मिळू शकतील.”

मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. नताशा वर्मा पुढे म्हणाल्या की, ''रोबोटिक-सहाय्यक शस्त्रक्रियेचे अनेक फायदे आहेत. जसे की लहान चीरे आणि कमी रक्तस्त्राव, ज्यामुळे जखम अत्यंत कमी काळात जुळून येते व रुग्णाला होणारा त्रासही कमी होतो. या तंत्रज्ञानामुळे शल्यचिकित्सकांना थ्रीडी हाय डेफिनेशन दृश्यासह अधिक अचूकतेने शस्त्रक्रिया करण्यास मदत होते. कारण ते त्यांना अंतर्गत अवयवांना अधिक चांगले दृश्यमानता प्रदान करते. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला वेदना कमी होतात. रुग्णालयातील अत्यंत अनुभवी शल्यचिकित्सक आता नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत आणि सर्वोत्तम रुग्णसेवा प्रदान करण्यास उत्सुक आहेत.

कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये रोबोटिक सहाय्यक सर्जरीच्या सुविधेविषयी बोलताना इन्टिट्यूव्ह इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट व जनरल मॅनेजर, मनदीप सिंग कुमार म्हणाले की, “कमलनयन बजाज रुग्णालय मराठवाड्यातील सर्व घटकांपर्यंत सर्वोत्कृष्ट सर्जिकल तंत्रज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. इन्टिट्यूव्हचा विश्वास आहे की, या तंत्रज्ञानामुळे शल्यचिकित्सकांना अनेक जटिल शस्त्रक्रिया सहजतेने करण्यास सक्षम केले जाऊ शकते. म्हणूनच, कमलनयन बजाज रुग्णालयासारख्या अग्रगण्य आरोग्य सेवा संस्था, रोबोटिक-सहाय्यक शस्त्रक्रियेसाठी, विशेषत: सुधारित वैद्यकीय परिणामांसाठी ओळखल्या जाणाऱ्या, दा विंची: ह्या नवीनतम तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्यास तयार असल्याचे पाहून आम्ही प्रोत्साहित होतो. इन्टिट्यूव्ह रोबोटिक प्रोग्रामच्या स्थापने द्वारे, रुग्णालयाची दूरदृष्टी आणि आमच्या तंत्रज्ञानावरील विश्वास, तसेच डॉक्टरांना प्रभावी उपचार करण्यास मदत करण्याची त्यांची सक्रियता दर्शवते.”

गेल्या काही वर्षांपासून (India) भारतात रोबोटिक सहाय्यक शस्त्रक्रियेची मागणी वाढत आहे. ही मागणी केवळ रोबोटिक-सहाय्यित शस्त्रक्रिया प्रदान करू शकणाऱ्या सुधारित रुग्ण परिणामांच्या संभाव्यतेमुळेच नव्हे, तर भारतातील सर्जन समुदायातील उत्कट आणि कुशल रोबोटिक सर्जनच्या वाढत्या संख्येच्या साक्षीने तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या उत्साहाने देखील प्रेरित आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com