Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याप्राध्यापकाचा खुनी निघाला अल्पवयीन आरोपी !

प्राध्यापकाचा खुनी निघाला अल्पवयीन आरोपी !

औरंगाबाद- Aurangabad

बहुचर्चित प्रा. डॉ. राजन शिंदे (Pvt. Dr. Rajan Shinde) यांच्या खून (murder) प्रकरणात मारेकऱ्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतले. मारेकरी हा विधिसंघर्षग्रस्त अर्थात अल्पवयीन मुलगा असून, त्याने प्रा. डॉ. राजन शिंदे यांच्यासोबत झालेल्या वादानंतर टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. प्रा. शिंदे (Dr. Rajan Shinde) यांनी ‘तू मरत का नाहीस’ असे म्हटल्याचा राग त्या युवकाच्या मनामध्ये होता. त्याने खून करून गुन्ह्यात वापरेले साहित्य एका जुन्या विहिरीत फेकले होते. दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर अखेर विहिरीतून गुन्ह्यात वापरलेले डंबेल्स आणि घरगुती वापराच्या चाकूसह एक टॉवेलही बाहेर काढण्यात आला.

- Advertisement -

शहरातील एन-२ या कॉलनीतील तुकोबानगर भागात ११ ऑक्टोबर रोजी आझाद कॉलेजमधील प्रा. डॉ. राजन शिंदे यांचा त्यांच्या घरामध्येच खून करण्यात आला होता. ही घटना ११ ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आली. या घटनेनंतर पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव व अन्य पोलिस अधिकारी व कर्मचारी या प्रकरणाचा तपास करीत होते. या तपासात शुक्रवारी डॉ. राजन शिंदे (Dr. Rajan Shinde) यांच्या मारेकऱ्याने खुनाची कबुली दिली होती. त्याने खून केल्यानंतर गुन्ह्यातील साहित्य व टॉवेल घराजवळील सार्वजनिक विहिरीत फेकल्याची कबुली दिली होती. या कबुलीनंतर विहिरीतून पाणी उपसून शस्त्र काढण्याचे प्रयत्न सुरू झाले.

दोन दिवसांनंतर पोलिस विहिरीच्या तळापर्यंत पोहोचले. गाळ काढल्यानंतर या वस्तू हाताशी आल्या. पुरावा हाती आल्यानंतर पोलिसांनी या विधिसंघर्षग्रस्त युवकाला ताब्यात घेतले. त्याला विहिरीजवळ आणले. त्यांनी विहिरीतील वस्तूंची माहिती दिल्यानंतर हे पुरावे बाहेर काढण्यात आले.

तपास अधिकारी पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, पोलिस निरीक्षक गीता बागवडे आणि बाल कल्याण समितीच्या सदस्यासह अन्य दोन पंचांसमोर या साहित्यांचा पंचनामा करण्यात आला आहे. या प्रकरणात खुनासाठी वापरलेले पुरावे जप्त करून अधिक तपासासाठी संबंधीत विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बाल न्यायालयात केले हजर

या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या विधिसंघर्षग्रस्त बालकाला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले. बाल न्याय मंडळाने सदर प्रकरणातील बालकाला निरीक्षणगृहात पाठविण्याचे आदेश दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या