Video जायकवाडी धरणाचे जलपूजन ; जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना

Video जायकवाडी धरणाचे जलपूजन ; जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना

औरंगाबाद - Aurangabad

कालपासून जायकवाडी प्रकल्पाच्या (Jayakwadi project) पाणलोट क्षेत्रात (Heavy rain) जोरदार पाऊस पडल्यामुळे तसेच सद्यस्थिती देखील जोरदार पाऊसाचा इशारा दिलेला असल्यामुळे आज 29 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत एकूण 92.31 टक्के जलसाठा झाला आहे आणि अजून त्यामध्ये भर पडत असून सध्या धरणाचे चार दरवाजे उघडले आहेत.

Video जायकवाडी धरणाचे जलपूजन ; जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना
नदीकाठावर धास्ती वाढली! जायकवाडीत तब्बल 'इतक्या' क्युसेकने पाण्याची आवक

प्रकल्पात 100 टक्के जलसाठा लवकरच होऊ शकतो. जायकवाडी प्रकल्पाच्या खालील गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात उतरू नये, गुरेढोरे, विदुयत साहित्य, वैगरे असल्यास लागलीच काढून घ्यावे, असे पूर नियंत्रण कक्ष, जायकवाडी प्रकल्प, पैठण कळवले आहे.

10 हजार क्यूसेसचा विसर्ग

दरम्यान, सकाळी 11 वाजता (Collector Sunil Chavan) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जलपूजन (Jalpujan) करून जायकवाडी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले.

Related Stories

No stories found.