जळगावकरांनो, बलूनच्या अवशेषाला स्पर्श करू नका!

टीआयएफआरचे आवाहन
जळगावकरांनो, बलूनच्या अवशेषाला स्पर्श करू नका!

औरंगाबाद - aurangabad

हैदराबाद (Hyderabad) येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (Tata Institute of Fundamental Research) या संस्थेकडून वैज्ञानिक संशोधनासाठी ३० नोव्हेंबर ते ३० एप्रिल २०२३ दरम्यान अवकाशात १० बलून फ्लाईट्स सोडण्यात येत आहेत. या बलून्समध्ये वैज्ञानिक उपकरणे असून काही दिवसानंतर ती रंगीत पॅराशूटसह औरंगाबाद, परभणी (Aurangabad, Parbhani) तसेच जळगाव (jalgaon) जिल्ह्यात जमिनीवर पडण्याची शक्‍यता आहे. या बलूनला कोणीही स्पर्श करू नये, बलून पडल्याची माहिती तात्काळ सरकारी विभागाला देण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

आकाशातून पडलेल्या कोणत्याही बलूनला किंवा उपकरणांना कोणीही स्पर्श करू नये किंवा कोणत्याही प्रकारची छेडछाड करू नये. अशी उपकरणे आढळून आल्यास जवळचे पोलीस ठाणे, टपाल कार्यालय, स्थानिक प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनास संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव महेश वडदकर यांनी केले आहे. 

औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद, सांगली, सातारा, अहमदनगर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, जळगाव, परभणी आणि सोलापूर येथेही ही उपकरणे जमिनीवर आढळून येऊ शकतात. अणुऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या बलून फॅसिलिटीमधून फुगे सोडले जात आहेत. हे फुगे पातळ (पॉलिथिन) प्लास्टिक फिल्म्सपासून बनवलेले असून ५० मीटर ते ८५ मीटर व्यासाचे असतात. ते हायड्रोजन वायूने भरलेले असतात. संशोधनासाठी वैज्ञानिक उपकरणे वाहून नेणारे फुगे, हाती घेतलेल्या प्रयोगानुसार ३० किमी ते ४२ किमी दरम्यान उंची गाठतील. काही तासानंतर ही उपकरणे मोठ्या रंगीत पॅराशूटसह जमिनीवर खाली येतात.

सुमारे २० ते ४० मीटर लांबीच्या एका लांब दोरीवर, त्याच्या खाली लटकलेली उपकरणे असलेले पॅराशूट, साधारणपणे हळू हळू जमिनीवर येतात. ही उपकरणे हैदराबादपासून सुमारे २०० ते ३५० किमी अंतरावर असलेल्या बिंदूंवर उतरू शकतात. विशाखापट्टणम हैदराबाद-सोलापूर मार्गावर, आंध्र प्रदेश, उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये हे बलून वाहतील. वैज्ञानिक संशोधनासाठी ठेवण्यात आलेली उपकरणे अत्यंत संवेदनशील आहेत आणि त्यांच्याशी छेडछाड केल्यास अत्यंत महत्त्वाची वैज्ञानिक माहिती नष्ट होईल. त्यातील काही उपकरणांवर हाय व्होल्टेज असू शकतात, ती उघडण्याचा अथवा हाताळण्याचा प्रयत्न केल्यास धोकादायक ठरू शकतात.

माहिती देणाऱ्याला बक्षीस


सदरील उपकरणे जमिनीवर खाली आल्याबाबत माहिती दिल्यानंतर प्रयोग करणारे शास्त्रज्ञ उपकरणे गोळा करतील आणि या बलूनची माहिती देणाऱ्याला योग्य बक्षीस देतील तसेच टेलिग्राम पाठवणे, फोन करणे, माहिती पोहोचवण्यासाठी प्रवास करणे इत्यादी सर्व वाजवी खर्च देतील. मात्र उपकरणासोबत कोणतीही छेडछाड केल्याचे आढळून आल्यास कोणतेही बक्षीस दिले जाणार नाही

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com