व्हिसा संपूनही वास्तव्य करणाऱ्याला जेलची हवा

औरंगाबादेतील घटना
व्हिसा संपूनही वास्तव्य करणाऱ्याला जेलची हवा

औरंगाबाद - aurangabad

व्हिसाची (Visa) मुदत संपल्यानंतर देखील आठ वर्षांपासून (India) भारतात वास्तव्य करणाऱ्या यमनच्या तरुणाला एक वर्षे एक महिने सहा दिवसांचा कारावास आणि पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.जे. पाटील यांनी ठोठावली. विशेष म्हणजे न्यायांलयाने आरोपीला शिक्षेविरोधात अपील करण्याची मुभा देत त्याचा पासपोर्ट परत करून त्याची कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देशही दिले.

अली मोहम्मद अवद बीन हिलाबी (३१, रा. अबरार कॉलनी, बीड बायपास रोड मुळ रा. सना-६०, यमन) असे आरोपीचे नाव आहे. प्रकरणात (Satara Police) सातारा पोलीस ठाण्याचे शिपाई कारभारी नलावडे (५०) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार पोलीस आयुक्तालयातील दहशतवाद विरोधी सेलकडून नियमितपणे विदेशी नागरिकांची तपासणी केली जाते. तपासणीदरम्यान यमन येथील चार नागरिक शहरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी चौघांच्या कागदपत्रांची तपासणी करुन चौकशी केली असता आरोपी अली मोहम्मद अवाद हा गेल्या आठ वर्षांपासून अवैधरित्या भारतात राहत असल्याचे समोर आले.

विशेष म्हणजे आरोपीने शहरातील तरुणीशी विवाह करुन संसार थाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याच्याकडे पोलिसांना भारताचे (Voting Card, Pan Kai and Aadhar Card) मतदान कार्ड, पॅन काई आणि आधार कार्ड देखील आढळून आले आहे. प्रकरणात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपी अली मोहम्मद अबद याला दोषी ठरवून विदेशी नागरिक कायद्याच्या कलम १४ अन्वये एक वर्षे एक महिना सहा दिवसांचा कारावास आणि पाच हजार रुपये दंडाच्या शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त एक महिन्याची शिक्षा भोगावी लागणार आहे. पैरबी अधिकारी म्हणुन सहायक फौजदार व्ही.बी. साळवे यांनी काम पाहिले.

Related Stories

No stories found.