Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedपीएफआयला इंटरनॅशनल फंडिंग झाल्याचे उघड

पीएफआयला इंटरनॅशनल फंडिंग झाल्याचे उघड

औरंगाबाद – aurangabad

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) पाचही आरोपी पदाधिकार्यांच्या पोलीस (police) कोठडीत ४ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.एल. मोरे यांनी दिले. पोलीस कोठडी दरम्यान, या आरोपींकडून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर फंडिंग होत असल्याचे महत्त्वाचे पुरावे एटीएसच्या हाती लागले आहेत. विशेष म्हणजे राज्यातील नाशिक, नांदेड, मुंबई आणि औरंगाबाद येथून २१ जणांना अटक करण्यात आली होती, ते २९ जण एकमेकांच्या संपर्कात होते, अशी माहिती देखील एटीएसच्या हाती लागली आहे.

- Advertisement -

एनआयने पीएफआय संघटनेविरोधात पुरावे मिळल्यानंतर कारवाईच्या काही दिवसांपूर्वी पीएफआयचे बँक खाते गोठवण्यास सुरुवात केली होती. कारवाईचा सुगावा लागाताच सप्टेंबर महिन्यात मडगाव (गोबा) व महाराष्ट्रात एक बैठक घेऊन संघटनेच्या देशातील मुख्य व्यक्तींना, पदाधिकाऱ्यांना मोबाइल आणि इतर सोशल मीडियावरील डाटा डिलीट करण्याचे आदेश दिले होते. अशी माहिती देखील एटीएसच्या हाती लागली आहे. कोठडी दरम्यान आरोपींच्या घराची झडती घेण्यात आली होती, यात आरोपींपैकी एक शेख इरफान ऊर्फ मौलाना इरफान मिल्ठी याच्या घरातून १९ इंचाची तलवार सारखे दिसणारे शस्त्र हस्तगत करण्यात आले. सर्व आरोपींचे बँक खाते तपासण्यात आले असता, त्यांच्या खात्यातून मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. तसेच एटीएसने आरोपींचे मोबाइल, लॅपटॉप आणि हार्डडिस्क हस्तगत केल्या असून त्यातील डाटा रिकव्हर करण्यासाठी ते फॉरेन्सिकला पाठविले आहेत. प्रकरणात एटीएसचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे आणि सहायक लोकाभियोक्ता विनोद कोटेच्या यांनी वरील सर्व मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती केली.

शेख इरफान शेख सलीम ऊर्फ मौलाना इरफान मिठ्ली (३७, रा. किराडपुरा), सय्यद फैजल सय्यद खलील (२८, रोजेबाग), परवेज खान मुजम्मील खान (२९, रा. जुना बायजीपुरा), जालन्याचा अब्दुल हादी अब्दुल रऊफ (३२, रा. रहेमान गंज) आणि शेख नासेर शेख साबेर (३७, रा. बायजीपुरा) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी सय्यद फैजल याचे डीसीबी बँकेत खाते असून त्याच्या खात्यावरुन देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले आहेत. खात्याची चालू माहिती मिळाली असून पूर्वीची माहिती गोळा करण्याचे काम सुरु असल्याचे एटीएसने कोर्टात नमुद केले. फैजल याने केरळमधुन प्रशिक्षण घेतले असून तो पीएफआयच्या वतीने बंद शेडमध्ये बीड आणि जालन्यातील ठराविक व्यक्तींना शारीरिक प्रशिक्षण देत असल्याचे एटीएसने न्यायालयाच्या निदर्शनास आणले.

आरोपी शेख नासेर हा पीएफआयचा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष असून त्याच्याच इशाऱ्यावर इतर आरोपी काम करित असल्याचे समोर आले आहे. एनआगने त्याचे बँक खाते सील केले असून खात्यात एक लाख ८० हजार रुपये होते. त्याची चौकशी केली असता पीएफआय संघटना दरमहा आपल्याला सहा हजार रुपयांचे वेतन (पेमेंट) देत असल्याचे त्याने सांगितले. नासेर याने नारेगाव आणि जिन्सी परिसरातील एका बंद शेडमध्ये मोजक्या व्यक्तीसोबत बैठका घेत असल्याचे देखील निदर्शनास आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या