पर्यटन विकासासाठी जागृती निर्माण करणे आवश्यक

डॉ. मिलनकुमार चावले यांचे मत
पर्यटन विकासासाठी जागृती निर्माण करणे आवश्यक

औरंगाबाद - aurangabad

पर्यटन (Tourism) हा जगातील सर्वात मोठा व्यवसाय असून भारतीय अर्थव्यवस्थेतील एकूण उत्पन्नामध्ये 9 टक्के त्याचा वाटा आहे. तो जर वाढवायचा असेल तर, जनसामान्यामध्ये जाणीव जागृती निर्माण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन भारतीय पुरातत्व खात्याचे औरंगाबाद परीमंडळाचे अधिक्षक पुरातत्त्वविद डॉ.मिलनकुमार चावले (Dr. Milan Kumar Chawle) यांनी केले.

पर्यटन विकासासाठी जागृती निर्माण करणे आवश्यक
आता चॉईस नंबरसाठी मोजावे लागणार इतके रुपये!

जागतिक पर्यटन दिनानिमित्त्त डॉ.बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास व प्राचीन भारतीय संस्कृती विभागामार्फत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. चावले म्हणाले की औरंगाबाद परीमंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व पुरातत्वीय व ऐतिहासिक स्थळांचा पर्यटन स्थळ म्हणून कसा विकास करता येईल याचे पीपीटीच्या माध्यमातून उदाहरणासह सादरीकरण केले. अंजिठा, वेरुळ, दौलताबाद, खुलताबाद, औरंगाबाद लेणी, बीबी-का- मकबरा येथील पुरातत्त्वीय स्थळांचा औरंगाबाद परीमंडळाने कसा विकास केला याबाबत माहिती दिली. ऐतिहासिक स्थळाच्या संरक्षण व जतन-दुरुस्ती कामात येणाऱ्या समस्या व त्यावर कशा प्रकारे उपाययोजन करावे याबाबात सविस्तर मार्गदर्शन केले. त्याच बरोबर अजिंठा व पितळखोरा लेणी येथील रोप -वे करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर केला आहे. राजकीय पाठींबा, प्रशासनातील समनव्यातुन व सामान्य जनतेचा सहभाग आवश्यक आहे. पुरातत्त्व पर्यटनामध्ये आगामी काळामध्ये अनेक संधी आहेत, त्यासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करावीत, असे मार्गदर्शन करताना सांगितले

अध्यक्षीय समारोपात बोलताना इतिहास व प्राचीन भारतीय संस्कृती विभागाच्या विभागप्रमुख डॉ. पुष्पा गायकवाड यांनी इतिहास, पुरातत्व व पर्यटन क्षेत्राचा आढावा घेऊन भविष्यकाळामध्ये नव-नवीन संशोधनातून इतिहास मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. औरंगबाद शहर हे प्राचीन ते आधुनिक कालखंडातील अनेक संशोधनाची दालने उपलब्ध आहेत. त्यावर नव्याने प्रकाश टाकावा असे संशोधक विद्यार्थ्यांना प्रतिक्रिया व्यक्त केली.

या कार्यक्रमाला डॉ. उमेश बगाडे, डॉ. गणी पटेल डॉ. अमोल कुलकर्णी, डॉ. कामाजी डक, लक्ष्मीकांत सोनवटकर, सुधीर बंलखंडे, कुमार भवर, अर्जुन पटेकर, सुरेश मादळे, डॉ. सुनिता सावरकर, जगदीश शेळके, मधुरा जगताप, तसेच इतिहास विभागातील विद्यार्थी, शहरातील मान्यवर व पर्यटन क्षेत्रातील अभ्यासक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. संजय पाईकराव यांनी केले. तर आभार प्रदर्शन कैलास लांडगे यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com