Thursday, April 25, 2024
HomeUncategorized6 वर्षे उलटूनही सिंचन कार्यालये सुरू झाली नाहीत! 

6 वर्षे उलटूनही सिंचन कार्यालये सुरू झाली नाहीत! 

औरंगाबाद- Aurangabad

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी जलसंपदा खात्याने फुलंब्री, खुलताबाद आणि वाकोद येथे कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव मंंजूर केला. त्यासाठी जागा उपलब्ध असताना 6 वर्षे उलटूनही कार्यालय सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय. कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी ग्रामीण भागातील कार्यालय सुरू करण्यास विलंब होत असल्याचा आरोप करत जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या प्रकरणी जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. कार्यालय सुरू करा अन्यथा तेथील कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवण्याचे आदेश त्यांनी महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना दिले आहेत.

- Advertisement -

जलसंपदा खात्याचे क्षेत्रीय स्तरावर शाखा कार्यालयाचे मुख्यालय असणे शेतकऱ्यांच्या सोयीसाठी तसेच प्रकल्पाच्या देखरेखीसाठी आणि व्यवस्थापनासाठी आवश्यक असल्याचे शासनाचे धोरण आहे. यामुळेच जलसंपदा विभागाने शासन निर्णय क्रमांक 30/3/2015 अन्वये औरंगाबाद पाटबंधारे सिंचन शाखा क्रमांक पाच -फुलंब्री,सहा- खुलताबाद व सात – वाकोद या शाखांची निर्मिती केली होती. मात्र, ग्रामीण भागात जाण्यायेण्याचा त्रास वाचावा यासाठी 6 वर्षे उलटूनही कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सोयीसाठी अद्याप या कार्यालयाला कार्यान्वित केलेले नाही. यामुळे मंजुरी मिळूनही हे कर्मचारी औरंगाबाद पाटबंधारे महामंडळातून सदर शाखेचे कामकाज चालवतात. यामुळे फुलंब्री, खुलताबाद व वाकोद या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या कामासाठी औरंगाबाद येथे यावे लागते. याचा आर्थिक व मानसिक त्रास शेतकऱ्यांना होत आहे.

राज्यमंत्र्यांकडे तक्रारी

मंजूरी होवूनही कार्यालय सुरू न झाल्याच्या तक्रारी जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यापर्यंत पोहचल्या. त्यांची याची गंभीर दखल घेत फुलंब्री, खुलताबाद व वाकोद कार्यालय तात्काळ कार्यान्वित करण्याच्या सूचना गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना केली. लवकरात लवकर कार्यालय सुरू न झाल्यास संबंधित शाखाधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवण्याचे आदेश त्यांनी कार्यकारी संचालकांना दिले.

इमारत तयार, इच्छाशक्तीचा अभाव

वाकोद येथे जलसंपदा विभागाची वसाहत असून येथे जलसंपदा विभागाचे विश्रामगृह आहे. या इमारतीतून वाकोद व खुलताबाद शाखा कार्यान्वित करता येऊ शकते. फुलंब्री येथे पाटबंधारे सिंचन मुख्यालय कार्यान्वित करण्यासाठी फुलंब्रीच्या तहसीलदारांनी 1 सप्टेंबर 2016 रोजी एका पत्राद्धारे जागा उपलब्ध करून दिली आहे. इमारत तयार असतांना सोयीचे ठिकाणी आणि इच्छाशक्तीचा अभाव यामुळे कार्यालय कार्यान्वित करण्यात आले नाही, असा आरोप बच्चू कडू यांचे विशेष कार्य अधिकारी संतोष राजगुरू यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या