Monday, April 29, 2024
HomeUncategorizedआयपीएलचं वेळापत्रक ठरलं? जाणुन घ्या सविस्तर माहिती

आयपीएलचं वेळापत्रक ठरलं? जाणुन घ्या सविस्तर माहिती

नाशिक | आयपीएल स्पर्धेचा यंदा १४ वा हंगाम असणार आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या महामारीमुळे स्पर्धा भारतामध्ये ठराविक मैदानावरच आयोजित करण्यासाठी बीसीसीआयचे प्रयत्न सुरु आहेत. भारतातील कोरोना विषाणूची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण स्पर्धेचा हंगाम भारतात आयोजित केला जाण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे…

लॉकडाऊन नंतर भारतात सय्यद मुश्ताक अली टी २० स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे यंदाच्या हंगामातील सर्व सामने मुंबईतील डीवायपाटील , ब्रेबॉर्न , रिलायन्स क्रिकेट मैदान आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान पुणे या मैदानावर स्पर्धेचे आयोजित केले जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

तसेच गुजरातमधील अहमदाबाद येथे बांधण्यात आलेले सरदार वल्लभभाई पटेल मैदानाचा यात समावेश करण्यात आला आहे . स्पर्धेचा १३ वा हंगाम भारतातील कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यूएईत आयोजित करण्यात आला होता.

केव्हा होणार सुरुवात ? आणि शेवट

आयपीएल स्पर्धेचा १४ वा हंगाम साधारपणे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ११-१४ दरम्यान सुरु होण्याची शक्यता आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना साधारणपणे कोरोना विषाणूच्या वाढत्या महामारीमुळे स्पर्धा जैव सुरक्षित वातावरणात स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यासाठी बीसीसीआय तयार नसताना वर्षाच्या अखेरीस टी २० विश्वचषकाचं आयोजन करण्यासाठी बीसीसीआय तयार असल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून सांगण्यात येत आहे. तसेच भारतात बायो सिक्युअर बबलचे आयोजन यशवीपणे करता येऊ शकतं असा बीसीसीआय दावा करत आहे .

भारतात आयपीएलचे आयोजन होऊ शकतं असे मत भारतीय क्रिकेट बोर्डाचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार स्पर्धेचा हंगाम भारतातच यशस्वीपणे पार पडेल. सध्या आम्ही स्पर्धेचं आयोजन परदेशात करण्याचा विचार करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे . भारतात यूएईपेक्षा कोरोनाचा आकडा नियंत्रणात आहे. तर यूएईत कोरोनाचा आकडा भारताच्या तुलनेत अधिक वाढत आहे.

सलिल परांजपे देशदूत नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या