Monday, April 29, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादच्या त्या क्लासचालकांना पुण्यात अटक

औरंगाबादच्या त्या क्लासचालकांना पुण्यात अटक

औरंगाबाद – aurangabad

आरोग्य भरती परीक्षा (Health Recruitment Exam) गट क आणि डच्या परीक्षेत औरंगाबाद येथील अकॅडमी (Academy) चालक अजय चव्हाण, कृष्णा जाधव, अंकित चनखोर यांना अटक करण्यात आली हाेती. (police) पोलिसांच्या तपासादरम्यान सदर तिघांचा म्हाडा भरती (Exam paper) परीक्षा पेपरफुटी प्रकरणातही सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने संबंधित तीन क्लास चालकासह राजेंद्र पांडुरंग सानप (रा. बीड) याला पुणे सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांच्या न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायालयाने चार आरोपींना २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

- Advertisement -

या प्रकरणात दहा जणांना अटक करण्यात आली. जी ए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख याच्यासोबत ( MHADA) म्हाडा परीक्षेचा पेपर आदल्या दिवशी फोडताना ११ डिसेंबर २०२१ रोजी पकडण्यात आलेले एजंट संतोष हरकळ, अंकुश हरकळ यांच्या संपर्कात संबंधित औरंगाबादचे तीन क्लास चालक असल्याचे दिसून आले. त्यांनी पेपरफुटीचा कट कसा रचला, परीक्षेच्या वेळी आरोपींकडे असलेल्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवण्याचे ठरवले, क्लास चालक हे उमेदवारांच्या सतत संपर्कात होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या