घरकुल घोटाळा : आता आयपी ॲड्रेसच्या माध्यमातून होणार तपास

लवकरच मोठा खुलासा शक्य
घरकुल घोटाळा : आता आयपी ॲड्रेसच्या माध्यमातून होणार तपास
Sandip Tirthpurikar

छत्रपती संभाजीनगर - Chhatrapati Sambhajinagar


निविदा घोटाळ्यातील प्रकरणामुळे प्रधानमंत्री आवास योजनेतील (Pradhan Mantri Awas Yojana) घरकुल प्रकल्पाची (Gharkul Project) 'ईडी'कडून चौकशी केली जात आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरच्या गुन्हे शाखेकडून देखील या निविदेतील बोगस प्रकरणांचा तपास सुरू करण्यात आला आहे. तथापि, महापालिका स्तरावरील चौकशीतून एकाच आयपी  ॲड्रेसवरून कंत्राटदार कंपन्यांनी साखळी करून निविदा भरल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच या निविदेतील घोटाळ्याच्या शंकेला वाव मिळाला. यापुढे मोठ्या प्रकल्पांच्या निविदा प्रक्रियेत प्रशासनाकडून आयपी ऍड्रेसची तपासणी केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

घरकुल घोटाळा : आता आयपी ॲड्रेसच्या माध्यमातून होणार तपास
तर औरंगजेबाची कबर हैदराबादला घेऊन जा!

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रस्तावित घरकुल प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत झालेला घोटाळा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. त्यावर राज्य सरकारने स्वतंत्र चौकशी समिती नेमून या समितीच्या अहवालावरून या प्रकल्पाची निविदा पक्रिया रद्द करण्याचा निर्णय दिला. त्यानंतर या प्रकरणाची कागदपत्रे ईडीने देखील राज्य मंत्रालयातून ताब्यात घेतली. ईडी प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आणखी एक नवा प्रकार समोर आला. याची माहिती डॉ. चौधरी यांनी दिली. 

जॉइंट व्हेंचरमध्ये असलेल्या कंपनीने निविदा सादर केली होती. त्यातील ज्ञाती या कंपनीच्या प्रतिनिधींनी निविदेच्या कागदपत्रांवरील स्वाक्षऱ्या आमच्या नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे निविदा सादर करताना बोगस स्वाक्षऱ्या केल्याची शंका उपस्थित होत आहे. मनपाने गुन्हा दाखल केल्यानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सुपूर्द केले आहे.

प्रारंभी महापालिकेच्या तपासणीतून एकाच आयपी ऍड्रेसवरून समरथ कन्स्ट्रक्शनसह या निविदा प्रक्रियेतील कंपन्यांनी साखळी करून एकाच आयपी ऍड्रेसवरून निविदा भरण्यात आल्याचे समोर आले. यामुळेच या निविदा प्रक्रियेच्या घोटाळ्यातील पुढील चौकशी हाती घेण्यात आली. मात्र, यामुळे महापालिकेचा घरकुल प्रकल्प आणखी काही महिने लांबणीवर पडला आहे. यापुढे मोठ्या प्रकल्पांत निविदा प्रक्रियेत आयपी ऍड्रेस तपासला जाईल का, अशी विचारणा प्रशासक डॉ. चौधरी यांना केली. त्यावर त्यांनी सांगितले की, साधारणपणे निविदा प्रक्रियेतील आयपी ऍड्रेस  तपासले जात नाहीत. मात्र, यापुढे मोठ्या प्रकल्पांतील निविदा प्रक्रियेत आयपी ऍड्रेस तपासण्यात येईल. यामुळे पुढे होणारा धाका टाळता येईल, असे डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले.

घरकुल घोटाळा : आता आयपी ॲड्रेसच्या माध्यमातून होणार तपास
तर औरंगजेबाची कबर हैदराबादला घेऊन जा!
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com