'स्मार्ट सिटी'ला फक्त जुन्या शहरातच 'इंट्रेस्ट'?

उपनगरे भकास अवस्थेत
'स्मार्ट सिटी'ला फक्त जुन्या शहरातच 'इंट्रेस्ट'?

औरंगाबाद - aurangabad

स्मार्ट सिटीअंतर्गत (smart city) सुरू असलेली कामे मुख्य शहरात एकवटली असून सातारा-देवळाईसह नव्याने विकसीत होत असलेल्या उपनगरांचा प्रशासनाला विसर पडला आहे. नवीन वसाहतीत मूलभूत सुविधांचीही वाणवा असून किमान डझनभर सुविधा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पूरवता येऊ शकतात. मार्चला प्रकल्पाची मुदत संपण्याआधी या भागाच्या स्मार्ट सिटीत समावेशाची मागणी जोर धरत आहे.

मार्चआधी समावेश करा : नव्याने विकसीत होणाऱ्या शहरातही स्मार्ट सिटीचे प्रकल्प पोहचले पाहिजेत. मार्चमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पाची मुदत संपत आहे. त्यापूर्वी सातारा-देवळाईसह उर्वरीत उपनगरांसाठी खास प्रकल्प आखून त्यांचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करावा.

-संजय शिरसाट, आमदार, औरंगाबाद पश्चिम

सातारा-देवळाईसाठी स्मशान भूमी, उद्यान, जॉगींग ट्रॅक, खेळाची मैदाने, अद्ययावत आरोग्य केंद्र, पालिकेतील वॉर्डाप्रमाणे कम्युनिटी सेंटर, ओपन स्पेसवर खुले रंगमंच उभारावे. स्मार्टसिटीने मार्किंग करून दिले तर खुल्या जागेवर उद्योजक सीएसआरमधून उद्यान, मियावाकी फॉरेस्ट तयार करण्यास तयार आहेत. बीड बायपासवर हॉटेल शिदोरी व हिवाळे पाटील लॉन्सजवळचे नाले कायम तुंबलेले असतात. त्यांचे खोलीकरण, रूंदीकरण करून खाम नदीच्या धर्तीवर पात्राचे सौंदर्यीकरण.

जुन्या शहरातच स्मार्टसिटी

स्ट्रीट ट्रान्स्फॉर्मेशन अंतर्गत क्रांतीचौक, कॅनॉटच्या रस्त्यांची रंगरंगोटी, जंक्शन डिझाईन, सायकल ट्रॅक क्रांती चौक ते स्टेशन मार्गावर, उर्वरीतही जुने शहर, सिडकोत. स्ट्रीट फॉर पीपल अंतर्गत पैठण गेट ते गुलमंडी व कॅनॉट प्लेसचा रस्ता वाहन मुक्त, लव्ह युअर सिटी अंर्तगत जुन्या शहरात फ्लेक्स, ५० डिजीटल आऊटडोअर डिस्प्ले, १०० स्मार्ट सिटी बस स्टॉप, स्मार्ट सिग्नल जालना रोडवर, लाईट हाऊस अंतर्गत कौशल्य विकास. या शिवाय नऊ दरवाजे, शहागंज घड्याळीची दुरूस्ती व सौंदर्यीकरण, क्रांतीचौक उड्डानपूलाखाली शिवसृष्टी, सुपरहिरो गार्डन, संत एकनाथ रंगमंदीर व सिडको नाट्यगृहाची दुरूस्ती, खाम नदी सौंदर्यीकरण जुन्या शहरात आहेत.

संपूर्ण शहर स्मार्ट करा : स्मार्ट सिटीमध्ये संपूर्ण शहर स्मार्ट होणे अपेक्षीत आहे. असे असतांना निवडक भाग स्मार्ट करणे चूकीच आहे. आजवर झालेल्या प्रकल्पांचे ऑडीट करून उपनगरांसाठी खास प्रकल्प आखावेत. संपूर्ण शहर स्मार्ट करा.

-प्रवीण सरदेशपांडे, शहर प्रश्नांचे अभ्यासक

जुन्या शहरासोबतच सिडको-हडको पुरते मर्यादीत असणारे शहर चारही बाजूने विस्तारत आहेत. बीड बायपास, सातारा-देवळाई, कांचनवाडी-नक्षत्रवाडी, वाळूज, पडेगाव-मिटमिटा, नारेगाव, मिसारवाडी, पळशी, चिकलठाणा, हर्सूल सावंगी येथे मोठ्या प्रमाणात वसाहती होत आहेत. यातील बहुतांशी भाग पालिकेच्या हद्दीत असतांना येथे मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतोय. शहराच्या समतोल विकासासाठी या सुविधा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पुरविण्याची गरज शहर विकासाच्या प्रश्नाचे अभ्यासक प्रवीण सरदेशपांडे यांनी वर्तवली.

सातारा-देवळाईत वेगवान विकास

धुळे-सोलापूर महामार्ग सुरू झाल्याने बीड बायपासवरील जड वाहतूक व पर्यायाने अपघात घटतील. रस्त्याचे चौपदरीकण, तीन उड्डानपूल, शिवाजीनगरात भुयारी मार्ग आणि १६८० कोटीच्या योजनेतून पाण्याची समस्या सुटल्याने या भागाला महत्त्व येणार आहे. नव्वदीच्या दशकात जालना रोड भोवताली ज्या वेगाने विकास झाला तसा विकास बीड-बायपास रोडवर होईल, असा विश्वास सातारा-देवळाई प्रश्नाचे अभ्यासक अॅड.शिवराज कडू पाटील यांना वाटतोय. मात्र, त्या तुलनेत येथे मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची खंत अॅड. कडू पाटील यांनी वर्तवली

सातारा-देवळाईसाठी स्मशान भूमी, उद्यान, जॉगींग ट्रॅक, खेळाची मैदाने, अद्ययावत आरोग्य केंद्र, पालिकेतील वॉर्डाप्रमाणे कम्युनिटी सेंटर, ओपन स्पेसवर खुले रंगमंच उभारावे. स्मार्टसिटीने मार्किंग करून दिले तर खुल्या जागेवर उद्योजक सीएसआरमधून उद्यान, मियावाकी फॉरेस्ट तयार करण्यास तयार आहेत. बीड बायपासवर हॉटेल शिदोरी व हिवाळे पाटील लॉन्सजवळचे नाले कायम तुंबलेले असतात. त्यांचे खोलीकरण, रूंदीकरण करून खाम नदीच्या धर्तीवर पात्राचे सौंदर्यीकरण. जुन्या शहरातच स्मार्टसिटी स्ट्रीट ट्रान्स्फॉर्मेशन अंतर्गत क्रांतीचौक, कॅनॉटच्या रस्त्यांची रंगरंगोटी, जंक्शन डिझाईन, सायकल ट्रॅक क्रांती चौक ते स्टेशन मार्गावर, उर्वरीतही जुने शहर, सिडकोत. स्ट्रीट फॉर पीपल अंतर्गत पैठण गेट ते गुलमंडी व कॅनॉट प्लेसचा रस्ता वाहन मुक्त, लव्ह युअर सिटी अंर्तगत जुन्या शहरात फ्लेक्स, ५० डिजीटल आऊटडोअर डिस्प्ले, १०० स्मार्ट सिटी बस स्टॉप, स्मार्ट सिग्नल जालना रोडवर, लाईट हाऊस अंतर्गत कौशल्य विकास. या शिवाय नऊ दरवाजे, शहागंज घड्याळीची दुरूस्ती व सौंदर्यीकरण, क्रांतीचौक उड्डानपूलाखाली शिवसृष्टी, सुपरहिरो गार्डन, संत एकनाथ रंगमंदीर व सिडको नाट्यगृहाची दुरूस्ती, खाम नदी सौंदर्यीकरण जुन्या शहरात आहेत. मार्चआधी समावेश करा नव्याने विकसीत होणाऱ्या शहरातही स्मार्ट सिटीचे प्रकल्प पोहचले पाहिजेत. मार्चमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पाची मुदत संपत आहे. त्यापूर्वी सातारा-देवळाईसह उर्वरीत उपनगरांसाठी खास प्रकल्प आखून त्यांचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करावा. -संजय शिरसाट, आमदार, औरंगाबाद पश्चिम संपूर्ण शहर स्मार्ट करा स्मार्ट सिटीमध्ये संपूर्ण शहर स्मार्ट होणे अपेक्षीत आहे. असे असतांना निवडक भाग स्मार्ट करणे चूकीच आहे. आजवर झालेल्या प्रकल्पांचे ऑडीट करून उपनगरांसाठी खास प्रकल्प आखावेत. संपूर्ण शहर स्मार्ट करा. -प्रवीण सरदेशपांडे, शहर प्रश्नांचे अभ्यासक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com