'लम्पी'ला रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून सूचना

नाक्यांवर कडक तपासणी 
'लम्पी'ला रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून सूचना

औरंगाबाद - aurangabad

लम्पी चर्मरोग (Lumpy skin disease) असल्याचे संशयीत असलेल्या किंवा संक्रमित झालेल्या प्राण्यांच्या प्रवेशास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने राज्याच्या असंक्रमित क्षेत्रात या रोगाच्या प्रसार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी सीमा तपासणी नाक्यांवर (Border Check Point) काटेकोर अंमलबजाबणी आणि कार्यवाही करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना सूचना दिलेली आहे.

याबाबत केंद्र सरकारने (Central Govt) लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्यास अवगत केले होते. गुरे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडत असलेला हा रोग राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि कश्मीर, अंदमान व निकोबार (संघ राज्य क्षेत्र), पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गोवा, झारखंड, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, मणिपूर, ओरिसा, तामिळनाडू, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या राज्यांत आधीच पसरला आहे. लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे, महाराष्ट्र राज्यामधील १७ जिल्ह्यामधील ५९ तालुक्‍यात ७ सप्टेंबरपर्यंत प्राण्यांच्या गोजाती प्रजातींमधील २५ गुरे आणि म्हशी मरण पावल्याचे कळविण्यात आले आहे.

लम्पी चर्मरोग (एलएसडी) हा जलद गतीने पसरणारा अनुसूचित रोग असल्याचे दिसून आले आहे. लगतच्या राज्यांमधून किंवा अन्य क्षेत्रामधून महाराष्ट्राच्या क्षेत्रात प्राण्यांच्या गोजातीय प्रजाती अजूनही प्रवेश करीत आहेत. म्हणून आता लम्पी चर्मरोगाचे नियंत्रण करण्यासाठी अधिक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे महाराष्ट्रासाठी अनिवार्य झाले आहे. प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास लम्पी चर्मरोगाच्या बाबतीत, नियंत्रित क्षेत्र म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्य घोषित करीत आहे.

लम्पी चर्मरोगावर नियंत्रण, प्रतिबंध किंवा त्याचे निर्मूलन करता येईल आणि गोजातीय प्रजातींची सर्व गुरे व म्हशी यांची, ज्या ठिकाणी ते पाळले जातात, त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई केली आहे. गोजातीय प्रजातींची बाधीत असलेली कोणतीही जिवंत किंवा मृत गुरे, गोजातीय प्रजातींच्या कोणत्याही बाधीत झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी असलेले गवत किंबा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांचे उत्पादन किंवा असे प्राणी, नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. तसेच, गोजातीय प्रजातीच्या गुरांचा बाजार, प्राण्यांच्या शर्यती, प्राण्यांची जत्रा, प्राण्यांचे प्रदर्शन आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com