Monday, April 29, 2024
HomeUncategorizedशहराबाहेर जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसेसची तपासणी

शहराबाहेर जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसेसची तपासणी

औरंगाबाद – aurangabad

नाशिक (Nashik) येथे खाजगी ट्रॅव्हल्स बसला (Travels bus) अपघातानंतर (accident) लागलेल्या आगीत अनेक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या प्रकरणानंतर आरटीओ (rto) अधिकारी सतर्क झाले आहेत. औरंगाबाद शहरातून बाहेरगावी जाणार्‍या ट्रॅव्हल्स बसेस बाहेर जाण्यापूर्वी आरटीओच्या पथकांनी प्रत्येक ट्रॅव्हल्स बसची कसून तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या तपासणीत असणार्‍या दोषी बसच्या विरोधात कारवाई करण्यात येत असल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांनी दिली.

- Advertisement -

नाशिक येथे चिंतामणी ट्रॅव्हल्सची अपघातग्रस्त बस जळून खाक झाली. या मध्ये बसमधील अनेक प्रवाशांचा जळून मृत्यू झाला. त्यामुळे आरटीओ अधिकारी सतर्क झाले
आहेत. दररोज सायंकाळनंतर शहरातील प्रत्येक ट्रॅव्हल्सचे कार्यालय आणि जेथे ट्रॅव्हल्सच्या बसेस थांबतात त्या सर्व ठिकाणी अधिकार्‍यांनी प्रत्येक बसची तपासणी केली. बसमध्ये फायर यंत्रणा आहे का, इमर्जन्सी एक्झीट कार्यरत आहे का, बसचे दरवाजे योग्य पद्धतीने उघडतात का, बसची कागदपत्रे, वाहन चालकाचा सक्षम परवाना, परमीट अशा सर्वच बाबींची तपासणी करण्यात आली.

एसटीच्या बसेसही तपासणार
खाजगी ट्रॅव्हल्स बसची वेळोवेळी तपासणी करण्यात येते, मात्र नाशिकच्या घटनेच्या अनुशंगाने ट्रॅव्हल्स बस प्रवासाला निघण्यापूर्वी सर्वच बसची तपासणी केली जात आहे. खासगी ट्रॅव्हल्स बससह एसटी महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या मार्गावरील बसेसची तपासणी मोहिम देखील हाती घेण्यात येणार आहे. या तपासणीत दोषी आढळलेल्या वाहनांच्या विरोधात कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांनी दिली आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या