Monday, April 29, 2024
HomeUncategorized'हर घर तिरंगा’ चित्ररथाला थाटात सुरुवात ; जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम

‘हर घर तिरंगा’ चित्ररथाला थाटात सुरुवात ; जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम

औरंगाबाद – aurangabad

‘आझादी का अमृतमहोत्सव’ अंतर्गत ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाबाबत जिल्हाभरात जनजागृती व्हावी, या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाने (District Information Office) चित्ररथाची (Chitrarath) निर्मिती केली आहे. चित्ररथाच्या माध्यमातून मतदार आधार प्रमाणिकरण (Aadhaar authentication) कार्यक्रम आणि कोविड लसीकरण (Covid vaccination) अमृत महोत्सवाची (Amrit Festival) देखील जनजागृती करण्यात येणार आहे.

- Advertisement -

या चित्ररथाला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हिरवी झेंडी दाखवली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात हा कार्यक्रम पार पडला. अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी उपस्थित होते. चित्ररथाच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात जागृती निर्माण करावी. आझादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत प्रत्येकाने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरावर राष्ट्रध्वज फडकवावा. हे करत असताना सर्वांनी ध्वज संहितेचे पालन करावे. यासह मतदार ओळखपत्र आधार कार्डला संलग्न करा. 15 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत 18 वर्षांवरील सर्वांना मोफत कोविड लसीकरणांतर्गत बुस्टर डोस देऊन कोविड लसीकरण अमृत महोत्सव साजरा होत असल्याबाबत जागृत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केले.

कामामध्ये गुणात्मक वृद्धी करा

सामान्य नागरिकांसाठी अनेक योजना राबविण्यात येतात त्या राबवितानाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामामध्ये गुणात्मक वृद्धी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय सिल्लोड येथे हर घर तिरंगा,स्‍वराज्‍य महोत्‍सव, ई-पीक पाहणी,सातबारा संगणकीकरण, प्रलंबीत फेरफार,आपत्ती व्यवस्थापन या विषया बाबत आढावा बैठक घेण्यात आली. राष्ट्रप्रेम व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत पण सन्मान करण्याचा एकच मार्ग असून राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित कार्यालयाची स्वच्छता करा, लोकांशी प्रेमपूर्वक व्यवहार करा, ई -पीक पहाणीची प्रक्रिया देखील लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या