Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedgood news भारतीय जवानांना मिळणार ‘भाभा कवच’

good news भारतीय जवानांना मिळणार ‘भाभा कवच’

नवी दिल्ली – New Delhi

भारतीय लष्करासाठी गुडन्युज असून भारतीय जवानांच्या संरक्षणासाठी भाभा अणु संशोधन केंद्राने बुलेटप्रुफ ड्रेस तयार केला आहे. ‘भाभा कवच’ असं नाव त्याला देण्यात आलं असून हैदराबादमध्ये त्याचं उत्पादन केलं जाणार आहे

- Advertisement -

भारतीय सैनिकांसाठी हा पूर्ण पोशाखच असून गोळ्यांच्या माऱ्यापासून त्यांचं संरक्षण होणार आहे. हे कवच एवढं मजबूत आहे की AK-47सारख्या अत्याधुनिक रायफलच्या गोळ्यांपासूनही त्याचा बचाव होणार आहे. वेगवान गोळ्याही त्यांना भेदून जाऊ शकणार नाहीत.

हे कवच खास धातूपासून तयार करण्यात आलं आहे. जागतिक दर्जाचं हे कवच असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ लक्षात घेऊनच त्याची निर्मिती करण्यात आल्याची माहिती MIDHANI चे संचालक संजय कुमार झा यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलतांना दिली.

हे संरक्षण कवच फक्त सीमेवर तैनात असलेल्या जवानांनाच नाही तर दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करणाऱ्या काश्मीरमधल्या जवानांनाही त्याचा मोठा फायदा होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या