Friday, April 26, 2024
HomeUncategorizedभारत आणि इंग्लंडमध्ये तिसरा कसोटी सामना उद्यापासून

भारत आणि इंग्लंडमध्ये तिसरा कसोटी सामना उद्यापासून

अहमदाबाद | भारत आणि इंग्लंड यांच्यातील ४ सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना २४ फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या मोटेरा या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर दुपारी दीड वाजता करण्यात येणार आहे…

४ सामन्यांच्या मालिकेत सध्या दोन्ही संघानी १-१ अशी बरोबर साधली आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्यासाठी भारतीय संघाला आपल्या उर्वरित २ सामन्यांपैकी किमान १ विजय मिळवणे आवश्यक असणार आहे.

- Advertisement -

भारतीय संघाला आतापर्यंत गुलाबी चेंडूवर झालेल्या २ सामन्यांमध्ये १ विजय आणि १ पराभव स्वीकारावा लागला आहे. तर इंग्लंडनं आपले दोन्ही सामने गमावले आहेत.

भारतीय संघाने कोलकाता येथे झालेल्या सामन्यात बांगलादेश संघाला १ डाव आणि ४६ धावांनी मात करून विजयी सलामी दिली होती.

पण २०२० मध्ये एडिलेड येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावांवर आटोपला होता.

या पराभवातून सावरून टीम इंडिया अहमदाबादमध्ये इंग्लंडचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. भारतीय संघाने बुधवारपासून मोटेरा मैदानावर कसून सरावाला सुरुवात केली आहे.

भारतीय संघासाठी जमेची बाजू म्हणजे रोहित शर्मा , शुभमन गील चांगली कामगिरी करत आहेत . कर्णधार विराट कोहलीला देखील फॉर्म गवसला आहे . चेन्नई येथे झालेल्या दोन्ही सामन्यांच्या दुसऱ्या डावात त्याने शानदार अर्धशतकी खेळी केली होती. त्याला आर अश्विन याने निर्णयक भागीदारी रचून शानदार शतकाच्या बळावर भारतीय संघाचा विजयाचा दावा अधिक मजबूत केला होता.

भारतीय संघाला चेतेश्वर पुजाराच्या खराब कामगिरीची देखील चिंता आहे. पूजाराला लवकरात लवकर फॉर्म गवसणे भारतीय संगासाठी महत्वाचे असणार आहे. शिवाय भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुभमन गील याला चेन्नई येथील दुसऱ्या सामन्यात हाताला दुखापत झाली होती.

अद्याप ही दुखापत कितपत गंभीर आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत त्याचा सहभाग अनिश्चित मानला जात आहे. शिवाय तेज गोलंदाजीत जसप्रीत बुमराहला संघात स्थान दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यामुळे भारतीय संघाला आपली कामगिरी अशीच उंचावण्याची संधी आहे. भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध उर्वरित दोन सामन्यांसाठी उमेश यादवला संघात स्थान दिले आहे. बाकी संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

दुसरीकडे दुसऱ्या कसोटीत ३१७ धावांनी पत्करलेल्या दारुण पराभवातून जागे होण्यासाठी इंग्लंड सज्ज आहे. इंग्लंड संघातही बदल केला जाण्याची शक्यता आहे. इंगलंड संघात उर्वरित दोन सामन्यांसाठीजॉनी बेरस्टोला इंग्लंड संघात स्थान देण्यात आले आहे. शिवाय सामना गुलाबी चेंडूवर होणार असल्यामुळे तेज गोलंदाज जेम्स अँडरसन संघात परतण्यासाठी उत्सुक आहे.

भारतीय संघाच्या फलंदाजीची मदार विराट कोहली , मयंक अगरवाल , रोहित शर्मा , शुभमन गिल , चेतेश्वर पुजारा , अजिंक्य राहणे , लोकेश राहुल , रिषभ पंत , वृद्धिमान सहा यांच्यावर आहे अष्टपैलूंमध्ये अक्षर पटेल , हार्दिक पंड्या , वॉशिंग्टन सुंदर आहेत गोलंदाजीत शार्दूल ठाकूर , ईशांत शर्मा , मोहंमद सिराज , जसप्रीत बुमराह आहेत.

इंग्लंड संघाच्या फलंदाजीची मदार ज्यो रूट , रोरी बर्न्स , जोस बटलर , झॅक क्रावली , बेन फोकस , डोम सिबली डॅन लोवरेन्स यांच्यावर आहे अष्टपैलूंमध्ये डोम बीस , मोईन अली , बेन स्ट्रोक्स , आहेत गोलंदाजीत स्टुअर्ट ब्रॉड , जेम्स अँडरसन , ओली स्टोन , मसान क्रेन , क्रिस वोक्स आहेत.

सलिल परांजपे देशदूत नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या