औरंगाबादकरांना विमानप्रवासाची ‘हौस’

विमान कंपन्यांचा वाढला नफा 
औरंगाबादकरांना विमानप्रवासाची ‘हौस’

औरंगाबाद - aurangabad

विमानतळावरून (Airport) विविध शहरांसाठी जाण्याची सुविधा मिळत असल्याने अनेक जण या विमान सेवेचा वापर (Airlines) करीत आहेत. गेल्या वर्षी (corona) करोनामुळे विमान सेवेवर मोठा परिणाम झालेला होता. मात्र, यंदाच्या वर्षी गेल्या दहा महिन्यांत औरंगाबाद विमानतळावरून तब्बल १ लाख ५० हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे.

नोव्हेंबरमध्ये विमानप्रवाशांची संख्या ३६ हजार इतकी राहिली. औरंगाबाद विमानतळावर सध्या इंडिगो आणि एअर इंडिया या दोन विमान कंपन्यांची सेवा सुरू आहे. करोना काळापूर्वी औरंगाबाद विमानतळावरून इंडिगो, एअर इंडियासह स्पाईस जेट आणि ट्रु जेट या विमान कंपन्यांच्या सेवा सुरू होत्या.

करोना काळात तसेच त्यानंतर स्पाइस जेट आणि ट्रुजेट या दोन्ही विमान कंपन्यांनी आपली सेवा बंद केली आहे. स्पाइस जेटने औरंगाबाद येथील कार्यालय हे शिर्डी येथे हलविण्यात आले आहे. सध्या औरंगाबाद मुंबई, दिल्ली, हैदराबाद या शहरांशी विमान कनेक्शन सुरू आहे. मुंबई आणि दिल्लीसाठी एअर इंडिया आणि इंडिगो विमानाची सेवा सुरू आहे. गेल्या वर्षी करोना काळात नोव्हेंबर २०२० मध्ये औरंगाबाद विमानतळावरून फक्त २० हजार प्रवासी गेले होते होते.

यंदाच्या वर्ष २०२१ नोव्हेंबर महिन्यात विमान प्रवाशांचा आकडा हा ३६ हजार ५५२ पर्यंत पोहोचला आहे. वर्ष २०२० मध्ये एप्रिल ते नोव्हेंबर या काळात ५५ हजार ६४० प्रवाशांनी विमानतळावरून प्रवास केला होता. यंदा वर्ष २०२१ मध्ये एप्रिल ते नोव्हेंबर या काळात १ लाख ५० हजार १८० विमान प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com