Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादमध्ये टेस्टिंग सेंटरची संख्या वाढवली

औरंगाबादमध्ये टेस्टिंग सेंटरची संख्या वाढवली

औरंगाबाद – aurangabad

औरंगाबाद शहरात. गेल्या चार दिवसांत १५ (corona) कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या (Municipal Corporation) यंत्रणेसमोरील चिंता वाढली आहे. जास्तीत जास्त कोरोना चाचण्या होण्यासाठी पालिकेने चाचणी केंद्रांची (Test center) संख्या वाढवण्यात आली आहे.

- Advertisement -

औरंगाबादमध्ये दोन वर्षात साकारणार सफारी पार्क!

राज्यातील काही जिल्ह्यात करोनावाधितांची संख्या वाढू लागलो आहे. प्रामुख्याने मुंबई-पुण्यात हे प्रमाण जास्त आहे. परंतु, आता औरंगाबादमध्ये देखील कोरोनाबाधित व्यक्ती आढळले आहेत. कोरोनाबाधित व्यक्ती आढळण्याचे प्रमाण औरंगाबादमध्ये शून्य झाले होते. मागील दोन ते तीन दिवसांपासून बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात एकाच दिवसात चार बाधित आढळले. त्यानंतर सुमारे चार दिवस रुग्ण आढळले नाहीत. त्यामुळे यंत्रणांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र, सहा जूनपासून पुन्हा रुग्ण आढळत आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ७ जून रोजी दोन रुग्ण आढळले. हे दोन्हीही रुग्ण १८ ते ५० वयोगटातील आहेत. ८ जून रोजी पाच रुग्ण आढळले. त्यापैकी चार रुग्ण १८ ते ५० या वयोगटातील असून एक रुग्ण पन्नास वषषांवरील गातील आहे. ६ जून रोजी एकही रुग्ण आढळला नाही. त्यानंतर ९ जून रोजी चार रुग्ण आढळले. त्यापैकी दोन रुग्ण १८ ते ५० या वयोगटातील, तर दोन रुग्ण ५० वर्षांवरील गटातील आहेत. नऊ जून रोजी चार रुग्ण आढळले. त्यापैकी दोन रुग्ण १८ ते ५० वयोगटातील, तर दोन रुग्ण ५० वर्षांवरील वयोगटातील आहेत.

महापालिकेच्या आरोग्य कोरोना चाचणी केंद्रात वाढ करून नऊ ठिकाणी नवीन केंद्रे सुरू केली आहेत. छावणी आरोग्य केंद्र, सिडको एन-११ आरोग्य केंद्र, सिडको एन-८ आरोग्य केंद्र, कैसर कॉलनी दवाखाना, घाटी रुग्णालयाची मेडिसीन विभागाची इमारत, सिडको ‘एन-२ कम्युनिटी सेंटर, पदमपुरा कोविड केअर सेंटर, मेल्ट्रॉन हॉस्पिटल, विमानतळ या ठिकाणी नव्याने चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत.ठी खुले करण्याचे नियोजन असल्याची माहिती ‘स्मार्ट सिटी’कडून देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या