औरंगाबाद जिल्ह्यात 12 रुग्णांची वाढ

दोन कोरोना बाधितांचा मृत्यू
औरंगाबाद जिल्ह्यात 12 रुग्णांची वाढ

औरंगाबाद - Aurangabad

जिल्ह्यातील 12 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या 18801 एवढी झाली आहे. त्यापैकी 13884 बरे झाले तर 589 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4328 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

ग्रामीण (9) - जामगाव रोड, गंगापूर (7), विठ्ठल मंदिर परिसर, गंगापूर (1), पाण्याच्या टाकीजवळ, सिल्लोड (1)

मनपा (3) - बन्सीलाल नगर (1), पोलिस कॉलनी, मिल कॉर्नर (1), सातारा परिसर (1)

दोन कोरोना बाधितांचा मृत्यू

एका खासगी रुग्णालयात रांजणगाव, वाळूज येथील 27, त्रिमूर्ती चौक, बजाज नगरातील 85 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com