सौम्य लक्षणांना गांभीर्याने घ्या!

तज्ज्ञांचा सल्ला
सौम्य लक्षणांना गांभीर्याने घ्या!

औरंगाबाद - aurangabad

कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये (Corona patient) पुन्हा एकदा वाढत होत असली, तरीही रुग्णांमधील लक्षणे सौम्य आहेत. त्यामुळे काळजी करण्यापेक्षा नेमकी काळजी घेण्यावर भर द्यायला हवा. त्यातही सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, स्वच्छता राखणे हे ज्येष्ठ नागरिक तसेच व्याधीग्रस्तांसाठी खूप गरजेचे आहे, असे शहरातील तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

शहरासह ग्रामीण भागातही कोविडच्या केसेस वाढत आहेत. शहरात मंगळवारी एकाच दिवशी २४ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे पुन्हा नवीन लाट येते की काय, अशीही शंका घेतली जात आहे. मात्र सध्याच्या केसेस सौम्य असल्याचे स्पष्ट करताना फिजिशियन्स असोसिएशनचे शहर सचिव डॉ. अनंत कुलकर्णी म्हणाले, सध्या नव्याने आढळून येणाऱ्या बाधितांमध्ये सर्दी, खोकला, ताप अशीच लक्षणे दिसून येत आहेत. यातील बहुतांश बाधितांना रुग्णालयात दाखल करून घेण्याची गरज पडत नसून, गृह विलगीकरणातच हे सर्व बाधित बरे होत आहेत. त्यामुळे तशी काळजी करण्याची गरज नसली तरी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, पुरेशी स्वच्छता राखणे गरजेचे आहे.तर, प्रौढ तसेच व्याधीग्रस्तांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे आणि तरीही जाणे आवश्यक असले तर निदान मास्क वापरणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com