Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedबबनराव लोणीकरांच्या अडचणीत वाढ

बबनराव लोणीकरांच्या अडचणीत वाढ

औरंगाबाद – aurangabad

मागासवर्गीय समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या (Lonikar) लोणीकर यांच्यावर (Atrocity) अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी (Republican Party of India) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि (Congress Committee) काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाने केली आहे. तर, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लोणीकर यांच्या घरावर शेण फेको आंदोलन करत लोणीकर यांचा निषेध केला. थकीत वीजबिलाचा वाद चिघळल्याने लोणीकर यांनी दोन्ही घरांचे लाईट बिल (Light bill) भरले.

- Advertisement -

आमदार बबनराव लोणीकर (MLA Babanrao Lonikar) यांचे औरंगाबाद शहरातील आलोकनगर भागात निवासस्थान आहे. त्यांचा मुलगा राहुल बबनराव यादव यांच्या नावावर मार्च २०२२ अखेरीस तीन लाख २१ हजार ५७० रुपये वीजबिल थकबाकी आहे. तर अशोकनगर येथील घराचे ६७ हजार २०० रुपये वीजबिल थकीत आहे. या घराचे वीज तोडल्याचे सांगत आमदार लोणीकर यांनी सहायक अभियंता दादासाहेब काळे यांना फोनवर शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. क्लिपमधील आवाज माझा नसल्याचा खुलासा लोणीकर यांनी केला आहे.

मात्र, लोणीकरांच्या कथित ध्वनीफितीतील अपशब्दांवर आंबेडकरी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाने गुरुवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन देऊन लोणीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. लोणीकर यांनी वीज बिलाबाबत महावितरण कर्मचाऱ्याला धमकी देऊन लोकशाहीच्या नियमांची पायमल्ली केली आहे. दलित वस्तीचा जातीवाचक उच्चार केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण शिरसाट म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या