
औरंगाबाद - aurangabad
मुंबई, भिवंडी (Mumbai, Bhiwandi) पाठोपाठ राज्यातील अनेक भागात लहान मुलांना गोवरची लागण (Measles infection) होत असल्याचे पुढे येत आहे. आजघडीला औरंगाबाद शहरात हा आकडा पाचच्या खाली असला तरी प्रशासनाकडून मोठी दखल घेण्यात येत आहे. गोवरची थोडीफारही लक्षणे दिसून आल्यास तात्काळ डॉक्टरांशी (Doctor) संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या (Department of Health) वतीने करण्यात आले आहे.
आता औरंगाबाद जिल्ह्यात गोवरचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. यापूर्वी तीन बालकांना गोवरची लागण झाल्याचे समोर आले होते. मात्र, रविवारी अजून दोन बालक गोवर पॉझिटिव्हच आले आहेत. यामुळे आता चिंता अजूनच वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४१ बालके संशयित आढळून आली आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहे.
मुंबईनंतर आता औरंगाबादेतदेखील गोवरचा प्रसार वेगाने होताना दिसत आहे. रविवारी शहरातील नहदी कॉलनी भागात राहणारे दोन बालकांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. ज्यात एका बालकाचे वय ७ वर्षे आहे तर दुसऱ्याचे बालकाचे वय ३ वर्षे आहे. दोन्ही शहरातील नेहरूनगर आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या नाहिद कॉलनीतील रहिवाशी आहेत. दोन्ही बालकांवर आरोग्य विभागाकडून उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. दोघांची प्रकृती ठीक आहे.
चालू महिन्याचा विचार केला असता आतापर्यंत या महिन्यात एकूण पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर तब्बल ४१ रुग्ण संशयित आहेत. सर्व संशयित रुग्णाचे नमुने हाफकीन प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यात सत्तत्याने संशयित रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणेकडून देखील खबरदारीचा उपाय म्हणून विविध भागात मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण करण्यात येत आहे.