Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedया शिवसैनिक व्यापाऱ्याकडे इन्कम टॅक्सची धाड

या शिवसैनिक व्यापाऱ्याकडे इन्कम टॅक्सची धाड

औरंगाबाद – aurangabad

कालपासून देशभरातील शंभराहून अधिक ठिकाणी सुरू असलेल्या धाडसत्राची झळ औरंगाबादपर्यंत येऊन पोहोचली आहे. सतीश व्यास नावाच्या एका व्यावसायिकाच्या तीन ठिकाणांवर इन्कम टॅक्सच्या (Income tax) अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या. या धाडीत नेमके काय मिळाले हे अद्याप समजले नसले तरी तो शिवसेनेशी निगडित असल्याचे समजते. त्यामुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.

- Advertisement -

Visual Story पारंपारिक साडी लूकमध्ये अशी दिसते पूजा सावंत

देशभरात विविध ठिकाणी आयकर विभागाची कारवाई सुरू आहे. आज आयकर विभागाने देशातील शंभर ठिकाणी छापेमारी केली आहे. दिल्लीपासून (Delhi), उत्तराखंड, महाराष्ट्र (Uttarakhand, Maharashtra) आणि राजस्थान (Rajasthan) सारख्या राज्यांमध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची पथके पोहोचली असून, चौकशी सुरू आहे. कर चुकवेगिरी प्रकरणी दिल्लीतील अनेक व्यावसाविक आयकर विभागाच्या रडारवर असल्याचे सांगण्यात आले आहे. जयपूरमध्ये व्यावसायिकांच्या कार्यालयावर आयकर विभागानं छापे टाकले आहेत. तसेच महाराष्ट्रातील औरंगाबादमध्येही आयकर विभागाने छापेमारी केली आहे.

शहरात आज पहाटे आयकर विभागाने तीन ठिकाणी धाडी टाकल्याने एकच खडबड उडाली आहे. ज्योतीनगर येथील शिवसेनेशी संबंधित असलेल्या एका धान्य व रिअल इस्टेट व्यापार्यासह इतर चार ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी केली ही कारवाई सुरू आहे. पुणे येथील आयकर विभागाचे पथक पहाटेच धडकले. येथे अधिकाऱ्यांनी झाडाझडती सुरू केली आहे. पहाटे चार वाजेपासून या ठिकाणी झडती सुरू आहे. सतीश व्यास असे धाड पडलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. ज्योतीनगर येथील त्यांच्या निवास्थानी आयकर विभागाचे पथक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली काही महत्वपूर्ण कागदपत्र जप्त करण्यात आले आहे. व्यास यांचे निवासस्थान आणि इतर तीन ठिकाणी आयकरच्या पथकाने धाड टाकल्याचे समजत आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, शहरात शिवसेनेशी संबंधित व्यावसायिकावर कारवाई सुरू असल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या