Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedमहिला तक्रार निवारण केंद्राच्या इमारतीचे उदघाटन

महिला तक्रार निवारण केंद्राच्या इमारतीचे उदघाटन

औरंगाबाद – Aurangabad

पोलीस अधिक्षक कार्यालय, औरंगाबाद (ग्रामीण) येथील महिला तक्रार निवारण केंद्र व भरोसा सेलच्या अद्यावत इमारतीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी या कक्षाच्या कामकाजाची सविस्तर माहिती जाणुन घेतली.

- Advertisement -

यावेळी पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील (Superintendent of Police Mokshada Patil), उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल नेहूल (Dr. Vishal Nehul), पोलीस निरिक्षक भागवत फुंदे यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले, पोलीस विभाग कायमच सामान्य नागरिकांचे जीवन सुरक्षित करण्याचे काम करत असतात. त्यात सध्या आधुनिकीकरणासोबत वाढत्या कौटुंबिक समस्या समोपचाराने सोडविण्यासाठी महिला तक्रार निवारण केंद्र व भरोसा सेल सारख्या उपक्रमातून भरोसा म्हणजेच विश्वास देण्याचे कामही पोलीस करीत आहे. हे कौतुकास्पद आहे. कौटुंबिक समस्या, वादविवाद या भरोसा सेल च्या माध्यमातून सोडविल्यास त्यांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. यात पोलीसांसह मानसोपचार तज्ज्ञ, वकील तसेच समाजकल्याण अधिकारी यांचे सहकार्याने तक्रारदारांचे अधिक चांगल्या प्रकारे समुपदेशनाचे कार्य होईल. त्यामुळे बरेच कुटुंब तुटण्यापासून वाचतील. नागरिकांच्या जीवनात विश्वास असणे हेही एक प्रकारे विकासाचे प्रतिक आहे, असे मतही जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच या भरोसा सेल साठी विविध साधन सामुग्रीची आवश्यकता भासल्यास मदत करण्यात येईल, असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.

पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील म्हणाल्या की, महिला तक्रार निवारण केंद्रात महिला तक्रार घेऊन येतात तेव्हा ती समस्या केवळ महिलेचीच नाहीतर संपूर्ण कुंटुंबाची समस्या असते. तेव्हा या कक्षाच्या माध्यमातून त्या कुटुंबांच्या समस्यांचे योग्य मार्गदर्शन, समुपदेशन केले जाते. या महिला तक्रार निवारण केंद्र व भरोसा सेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या कौटुंबिक समस्या निवारणासाठी फायदा होणार आहे. यावेळी श्रीमती मोक्षदा पाटील यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयाद्वारे महिला तक्रार निवारण केंद्राच्या अद्यावत इमारती सोबतच, पोलीसांसाठी उपहार गृह, परिपूर्ण सुविधा असलेले कैलास शिल्प सभागृह, पार्किंग व्यवस्था, अत्याधुनिक सुविधापूर्ण जीम, वाचनालय यासह विविध उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती दिली. यासोबतच कार्यालयास जिल्हानियोजन समितीच्या निधीतून प्राप्त वाहनांमुळे पोलीसांच्या कार्याची गतिमानता वाढली असून पोलीस अंमलदार, महिला अंमलदार यांचेमध्ये कर्तव्याप्रती उत्साह वाढल्याचे श्रीमती पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच डीपीडीसीतून निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल जिल्हाधिकारी यांचे आभार व्यक्त केले. यावेळी पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या