ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमाचे उद्घाटन

सढळ हाताने मदतीचे आवाहन
ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमाचे उद्घाटन

औरंगाबाद - aurangabad

देशसेवेसाठी ज्या सैनिकांनी (soldier) आपले जीवन समर्पित केले. अशा वीरगती प्राप्त झालेल्या शहिदांच्या प्रति नागरिकांनी कर्तव्य भावनेने ध्वजदिन निधीत सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन ध्वजदिन निधी (Flag Day Fund) संकलन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शिक्षणाधिकारी (Education Officer) एम. के. देशमुख यांनी केले.

मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्राच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सय्यदा फिरासत, कर्नल प्रविण कुमार, कर्नल जे.डी. काटकर, एसबीआय बँक क्रांती चौक शाखेच्या व्यवस्थापक श्रीमती शिवानी वर्मा, माहिती अधिकारी मीरा ढास यांच्यासह वीरपत्नी व सैनिकांचे कुटुंबिय उपस्थित होते.

सैन्यभरतीत औरंगाबाद जिल्याबितील तरुण मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आहेत. विविध ठिकाणी देशाच्या संरक्षण व सेवेसाठी तरुण तरुणी स्वत:हून पुढे येत आहेत. शाळेत विद्यार्थ्यांना देशसेवेचे विविध मार्ग दाखवले जातात. त्याचाच भाग म्हणून शिक्षण विभागाने विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या सहकार्याने भरीव मदत जिल्हा ध्वजदिन निधीत केली आहे. तसेच सैनिकांच्या कुटुबियांना यापुढे शिक्षण विभागामार्फत सहकार्य करण्याची ग्वाही देशमुख यांनी दिली.

सैनिकांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची व कार्याची तुलना होणे शक्य नाही. आपण सीमेवर लढण्यासाठी जावू शकत नाही. पण देशसेवा करणा-या सैनिकांप्रती आदरभाव ठेवून त्यांच्या कुटुबियाचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी नक्कीच मदत करु शकतो. याचसाठी जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वतीने सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन करण्यात येते. यामध्ये प्रत्येक नागरिकांनी सढळ हाताने आर्थिक मदत करावी, असे कार्यक्रमात मीरा ढास यांनी सांगितले. या कार्यक्रमास वीर पत्नी आणि शहिद कुटुबिंयाचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला. तसेच अग्नीवीर सैन्यभरती प्रक्रीयेत उमेदवारांसाठी वैद्यकीय मदत, अल्पोपहार तसेच इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विविध सामाजिक कार्य करणा-या संस्थांनी मदत केल्याबद्दल त्यांच्या प्रतिनिधींचा सत्कारही या कार्यक्रमात करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी भरतनाट्यम नृत्य सादर करण्यात आले. राष्टगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com