Friday, April 26, 2024
HomeUncategorized'सिद्धार्थ'मध्ये हेमलकसाहून येणार दोन अस्वल

‘सिद्धार्थ’मध्ये हेमलकसाहून येणार दोन अस्वल

औरंगाबाद –

हेमलकसा येथून (Bear) अस्वलाची जोडी आणण्यास मनपाला परवानगी मिळाली आहे. अस्वलांसाठी पिंजरे तयार करावे लागतील. त्यासाठी (Central Zoo) केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची परवानगी घेऊन पिंजरे तयार केल्यानंतरच साधारणपणे १५ ऑगस्टपर्यंत अस्वलाची जोडी सिद्धार्थ उद्‌यान प्राणिसंग्रहालय आणण्यात येईल, असे उपायुक्त सौरभ जोशी (Deputy Commissioner Saurabh Joshi) यांनी सांगितले.

- Advertisement -

(Marathwada) मराठवाड्यातील एकमेव महापालिकेचे सिद्धार्थ उद्‌यान प्राणिसंग्रहालय आहे. प्राणिसंग्रहालयात ३७६ प्राणी आहेत. त्यात प्रामुख्याने पिवळे व पांढरे १२ वाघ, बिबट्या, हरीण, काळवीट, नीलगाय, मोर, माकड, मगर व तरस या प्राण्यांचा समावेश आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यातून पर्यटक प्राणिसंग्रहालयास भेट देण्यासाठी येतात. प्राणिसंग्रहालयाला झू ऑथॉरिटीने परवानगी दिली आहे. प्राण्यांसाठी विशेष व्यवस्था ठेवण्यात आली असून त्यांची नियमित आरोग्य तपासणी केली. प्राणिसंग्रहालयात प्राण्यांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्त केले जात आहे.

यापूर्वी प्राणिसंग्रहालयात अस्वल, कोल्हा, लांडगा हे प्राणी आणण्यात आले होते. मात्र, झू ऑथॉरिटीच्या नियमांमुळे या प्राण्यांना परत पाठविण्यात आले. आता नव्याने पुन्हा हे प्राणी आणण्यासाठी मनपा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. देशातील महत्त्वाच्या प्राणिसंग्रहालयाशी प्राणी मिळविण्याच्या दृष्टीने पत्रव्यवहार सुरू केला आहे.

मनपाच्या सिद्धार्थ उद्‌यान प्राणिसंग्रहालयासाठी अस्वलार्च जोडी देण्याची तयारी हेमलळकस येथील प्रकाश आमटे यांच्या संस्थेनं दाखवली आहे. त्यामुळ महापालिकेने अस्वलाची जोर्ड आणण्याची तयारी सुरू केली आहे अस्वलांसाठी लागणारे पिंजरे तयार करण्यासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची परवानगी घेतर्ल जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या