
औरंगाबाद - aurangabad
बांधकाम साहित्य (Construction materials) दरवाढीपाठाेपाठ आता रेडीरेकनरचे (Redireckon) दरही वाढल्यामुळे औरंगाबादमध्ये घरे पाच ते सात टक्क्यांनी महाग होण्याची चिन्हे आहेत. (corona) कोरोनामुळे गेली २ वर्षे रेडीरेकनरचे दर वाढले नव्हते. मात्र, गुरुवारी ही दरवाढ जाहीर झाली. आता १ एप्रिलनुसार औरंगाबाद मनपा हद्दीतील १२.३८ टक्के व ग्रामीण भागासाठी ६.९६ टक्के रेडीरेकनरचे दर वाढले आहेत. तसेच औरंगाबाद प्रभाव क्षेत्रात ही दरवाढ ३.९० टक्के असेल, अशी माहिती नोंदणी उपमहानिरीक्षक सोहम वायाळ यांनी दिली.
दरवर्षी साधारण रेडीरेकनरच्या दरात ५ ते ६ टक्क्यांची वाढ करण्यात येते. मात्र, काेराेना काळात अर्थकारण ठप्प झाल्याने बांधकाम व्यावसायिकांनी राज्य सरकारला रेडीरेकनरचे दर वाढवू नका, अशी विनंती केली होती. त्यानुसार सरकारने मागील दाेन वर्षे दिलासा दिला हाेता. मात्र, आता दरवाढीमुळे जागेच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे. त्याचा परिणाम घराच्या खरेदीवर देखील होणार आहे.
क्रेडाईचे प्रमोद खैरनार यांनी सांगितले, रेडीरेकनरच्या वाढीमुळे जागांच्या किमती वाढणार आहेत. जागेचे दर वाढले की आपोआपचा त्याचा परिणाम घरांच्या किमतीवर होईल. त्यामुळे साधारण पाच ते सात टक्के घराच्या किमतीत वाढ होणार आहे.
गेल्या वर्षीच्या रेडीरेकनर दरानुसार शहराच्या हद्दीत एखाद्या प्लॉटची किंमत ३० लाख असेल तर आता नव्या दरानुसार ती ३६ लाख इतकी होईल. त्यानुसार स्टॅम्प ड्यूटी १ लाख ८० हजार रुपये इतका खर्च येईल. ग्रामीण भागात ज्या प्लॉटची किंमत ३० लाख होती त्याची आता ३२ लाख किमत होईल. त्यासाठी स्टॅम्प ड्यूटी व इतर खर्च १ लाख २८ हजार इतका लागणार आहे. औरंगाबाद प्रभाव क्षेत्रात गेल्या वर्षी ज्या मालमत्तेचे दर ३० लाख होते ते अाता ३१ लाख ७० हजार होतील. त्यासाठी नोंदणी शुल्क १ लाख १७ हजार रुपये इतके लागेल.