औरंगाबादमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या निम्म्याने घटली 

केवळ 33 रुग्णांवर उपचार सुरू 
औरंगाबादमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या निम्म्याने घटली 

औरंगाबाद - Aurangabad

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत असून, गेल्या दहा दिवसांत रुग्णसंख्या निम्म्याने घटल्याचे स्पष्ट झाले आहे. सद्यस्थितीत घाटीत 33 बाधितांवर उपचार सुरू आहेत. यातील गंभीर रुग्णांची संख्या 23 असल्याचे घाटी प्रशासनाने सांगितले आहे.

घाटीमध्ये आता कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असल्याचे पुरेसे स्पष्ट झाले आहे. गेल्या दहा दिवसांत ही संख्या निम्म्याने घटली आहे. आठ जुलै रोजी घाटीमध्ये 59 कोरोना रुग्ण दाखल होते. यापैकी 50 रुग्णांची प्रकृती गंभीर, तर 9 रुग्णांची प्रकृती सामान्य होती; तसेच 19 जुलै रोजी घाटीमध्ये 33 रुग्ण दाखल आहेत. यातील 23 रुग्णांची प्रकृती गंभीर, तर 10 रुग्णांची प्रकृती सामान्य आहे.

रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोनाची रुग्णसंख्याही घटत असल्याचे स्पष्ट झाले असून, जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे केवळ सहा रुग्ण दाखल असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे दोन्हीकडे नॉन-कोव्हिड सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाही. मात्र, तरीही घाटीमध्ये अनेक नॉन-कोव्हिड सेवांना सुरुवात झाल्याचा दिलासा आहे.

घाटीतील 'सुपरस्पेशालिटी ब्लॉक'मधील (एसएसबी) वॉर्ड क्रमांक 31, 32 व 33 तसेच, आयसीयू क्रमांक 2, 3 व 4 येथे देखभाल-दुरुस्तीची कामे सुरू आहेत. तरीही 'एसएसबी'मध्ये 9 रुग्ण 'एनआयव्ही'वर व एक रुग्ण गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com