औरंगाबादमध्ये एक लाख नागरिकांनाच मिळाले दोन्ही डोस

औरंगाबादमध्ये एक लाख नागरिकांनाच मिळाले दोन्ही डोस

सोमवारपर्यंत लसींची प्रतीक्षा

औरंगाबाद - Aurangabad

शहरात आजवर 4 लाख 79 हजार 976 नागरिकांनी (Corona) कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली आहे. मात्र यापैकी केवळ 1.11 लाख नागरिकांचेच लसीकरण (Vaccination) पूर्ण झालेले आहे. उर्वरीत सर्व नागरिकांना अजून दुसरा डोस घेणे बाकी आहे. मागील दोन दिवसांपासून लसींचा पुरवठा झाला नसल्याने लसीकरण बंद आहे. त्यामुळे दुसरा डोस थकलेल्यांची संख्या 50 हजारांच्याही वर गेली आहे. आगामी दोन-चार दिवसांत लसी मिळाल्या नाहीत तर दुसर्‍या डोसची वेटींग लिस्ट आणखी वाढणार आहे.

औरंगाबाद शहरात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना मध्यंतरी लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळत होता. त्यावेळी केवळ 45 वर्षांवरील नागरिकांचेच लसीकरण केल जात होते. दरम्यान, शासनाने 18 ते 44 वर्षांवरील नागरिकांसाठीही लसीकरण सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. तेव्हापासून आजवर औरंगाबाद शहरात कोरोना लसीकरणाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र त्या प्रमाणात लसींचा पुरवठा होत नसल्याने महापालिकेच्या 8पान 3 वर

मागील दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्याला लसींचा पुरवठा झालेला नाही. तो कधी मिळेल, याचीही शाश्‍वती राज्याच्या आरोग्य विभागाकडून अद्याप मिळालेली नाही. किमान सोमवारपर्यंत लसींचा पुरवठा होण्याची शक्यता कमीच असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले. सोमवारपर्यंत लस उपलब्ध झाली नाही तर दुसरा डोस घेणारांची वेटींग लिस्ट 80 हजारांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

दिवसेंदिवस दुसरा डोस घेणारांची वेटींग लिस्ट वाढतच आहे. त्यामुळे शासनाकडून लसींचा पुरवठा झाल्यास 80 टक्के लसीकरण केंद्र दुसर्‍या डोस घेणार्‍यांसाठीच आरक्षित केले जातील. इतर केंद्रांवर काही दिवस कोविन अ‍ॅपवर नोंदणी केलेल्यांनाच लस दिली जाईल, असे पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com